पुणे - भारत आणि चीनदरम्यान लडाखच्या पूर्वेकडील सीमेवर सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक निमू प्रांताला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लडाखमध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीचा चीन धसका घेईल, असे मत माजी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.
भारत-चीन हा वाद येणाऱ्या काळात कायम सुरू राहणार असला तरिही, पंतप्रधानांच्या भेटीने लष्कराचे मनोबल नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे मनोबल वाढवण्यासोबतच स्थानिकांना स्वतः पंतप्रधान तुमच्या सोबत असल्याची जाणीव करून दिली आहे, असे महाजन यांनी सांगितले.
तसेच चीनने भारताच्या भूभागावर केलेल्या अतिक्रमणावर देखील पंतप्रधान भूमिका मांडतील, असे त्यांनी सांगितले.