ETV Bharat / city

मशिदीवर भोंगे लावले म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही - रामदास आठवले

author img

By

Published : Apr 11, 2022, 2:37 PM IST

मशिदीवर परंपरागत भोंगे ( Ramdas Athawale on Raj Thackeray mosque comment ) लावले आहे म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही. विरोधाला विरोध करणे हे योग्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale comment on Raj Thackeray
राज ठाकरे मशीद भोंगे विधान रामदास आठवले प्रतिक्रिया

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ( Ramdas Athawale on Raj Thackeray mosque comment ) केलेल्या विधानानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले की, मशिदीवर परंपरागत भोंगे लावले आहे म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही. विरोधाला विरोध करणे हे योग्य नाही. राज ठाकरे ( Ramdas Athawale comment on Raj Thackeray ) हे एका पक्षाचे नेते आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ते वारसदार नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहे. पण, उद्धव ठाकरे हे त्यांचे वारसदार असूनही ते आमच्या सोबत येत नाही याचे दुःख आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.

प्रतिक्रिया देताना कंद्रीय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा - IPL 2022 RCB vs MI : विराट आणि रोहित शर्माला भेटणं चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महामुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसबरोबर जाऊ दिले नसते. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर अजूनही विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विचार बदलावे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोडावे आणि भाजपबरोबर एकत्र यावे, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर ( Ramdas Athawale on sharad pawar house attack ) विचारले असता आठवले म्हणाले की, एस.टी कामगारांच्यावतीने पवार साहेबांच्या घरी जो काही हल्ला करण्यात आला आहे. तो अत्यंत निंदनीय आहे. एस.टी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे. असे वळण देणे योग्य नाही. पवार यांच्या घरावर जो काही हल्ला झाला आहे, त्याला उद्धव ठाकरे, हे सरकार जबाबदार आहे. सरकारने विलिनीकरण करण्याचा विचार करावा, तसेच जे आंदोलक आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण, सेवेत घेणार नाही हा निर्णय अयोग्य आहे, असे देखील आठवले म्हणाले.

काल दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात जे काही भांडणे झाली त्यावर आठवले यांना विचारले असता ते म्हणाले की, जेएनयू विद्यापीठात वेगवेगळ्या विचारधारेचे विद्यार्थी असतात. जी घटना काल झाली ती व्हायला नको होती. त्याची चौकशी झाली पाहिजे. भारत देश सर्वधर्मांचा देश आहे. सर्व भावनांचा आदर केला पाहिजे. अश्या पद्धतीने व्हेज नॉनव्हेजवरून वाद व्हायला नको, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - मग मातोश्रीवर हल्ला करायचा होता ना.. काय किंमत मोजावी लागली असती, ते कळले असते - आमदार दिलीप मोहिते

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.