पुणे- पुणे जिल्ह्यात काल पासून परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तर काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. सध्या पुणे शहरात पाऊस जरी थांबला असला तरी आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.
काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरा थांबला. मुसळधार झालेल्या पावसाने पुणे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर सिंहगड रोड येथे पावसाच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्या आहेत. पाऊस थांबल्यानंतरही काही भागात पाणी सकाळपर्यंत साचले होते. सिंहगड रोडवरील पनमळा परिसरात मोठ्याप्रमाणत पाणी साचल होत. रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीला आणि स्थानिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पात्रात ३४२० क्यूसेक वेगाने पाणी सोडलं जात आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज आणि उद्या पुण्यासह इतर भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात सिंहगड रोडवर मोठ्याप्रमाणात पाणी; पावसाचा धोका कायम
पुणे जिल्ह्यात काल पासून परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तर काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. सध्या पुणे शहरात पाऊस जरी थांबला असला तरी आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.