ETV Bharat / city

विशेष : पुण्यातील फॅशन स्ट्रीट जळून खाक, अनेक व्यावसायिक रस्त्यावर - पुणे आग

पुण्यातल्या कॅम्प परिसरात असलेले फॅशन स्ट्रीट म्हणजे शॉपिग च्या शौकिनांची आवडती जागा. कपडे, बूट, बॅगा, गॉगल, आभूषणे असे लेटेस्ट फॅशनचे ए टू झेड प्रकार हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे हे फॅशन स्ट्रीट. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीत होत्याचं नव्हतं झालं.

punes-fashion-street-burnt-in-fire
punes-fashion-street-burnt-in-fire
author img

By

Published : Mar 27, 2021, 5:31 PM IST

पुणे - पुण्यातल्या कॅम्प परिसरात असलेले फॅशन स्ट्रीट म्हणजे शॉपिग च्या शौकिनांची आवडती जागा. कपडे, बूट, बॅगा, गॉगल, आभूषणे असे लेटेस्ट फॅशनचे ए टू झेड प्रकार हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे हे फॅशन स्ट्रीट. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीत होत्याचं नव्हतं झालं. येथील किरकोळ व्यावसायिक एका फटक्यात रस्त्यावर आले आहेत. आगीने त्यांच्यापासून सर्वकाही हिरावून नेले आहे.

खरेदीसाठी आवडते ठिकाण -

कॅम्प परिसरात अतिशय चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वसलेल्या या फॅशन मार्केटमध्ये शेकडो लहान-मोठी दुकाने होती. नावच फॅशन स्ट्रीट असल्याने या मार्केटमध्ये नेहमीच झगमगाट, चकचकाट व उत्साह संचारलेला असायचा.

पुण्यातील फॅशन स्ट्रीट जळून खाक
शुक्रवारी लागली मोठी आग -
मात्र शुक्रवारी 26 मार्चला रात्री अकराच्या सुमारास या मार्केटमध्ये अचानक आग लागली आणि बघता बघता ही आग इतकी प्रचंड मोठी झाली की फॅशन स्ट्रीटची 500 पेक्षा जास्त दुकाने भस्मसात झाली. या आगीने संपूर्ण मार्केटची राखरांगोळी झाली. आज या मार्केटमध्ये जळालेल्या चीज वस्तूंचे अवशेष, राखेचे ढीग आणि भंगाराचे साम्राज्य आहे.

हे ही वाचा - प्रभादेवीत इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही

दाटीवाटीने शेकडो दुकाने -

पुणेकरांचे हे आवडते मार्केट अनेक वर्षापासून याठिकाणी आहे. कॅम्प सारख्या आधुनिक जीवन शैली अंगीकारलेल्या परिसरात असल्याने हे मार्केट काळानुरूप वाढतच गेले. 1997 मध्ये या मार्केटचे पुनर्वसन झाले आणि तेव्हापासून कॅम्पच्या एमजी रोड आणि ईस्ट स्ट्रीट रोडच्या दरम्यान दीड दोन एकर परिसरात हे मार्केट बहरतच गेले. दाटीवाटीने या ठिकाणी एक-एक दुकान वाढतच गेले. आज मितीला अनधिकृत असे तब्बल दोन हजारांच्या वर कपडे, मोबाईल, गॉगल, आभूषणे, पादत्राणे आणि इतर अॅक्सेसरीजची लहान मोठी दुकाने आहेत. हा सगळा परिसर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येतो. कॅन्टोन्मेंट बोर्डाने या भागातील भरमसाठ वाढलेली ही दुकाने अनधिकृत ठरवली होती. याला इथल्या व्यापाऱ्यांचा विरोध आहे. यासाठी न्यायालयीन लढाई देखील लढली गेली आहे.

षडयंत्राचा आरोप, चौकशीची मागणी -

अनधिकृत ठरवूनही या मार्केटला धक्का लागला नाही. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीने येथील व्यावसायिकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मार्केट बंद झाल्यानंतर काही तासात आग लागते आणि ही आग अचानक काही मिनिटात रौद्र रूप धारण कशी करते, ही बाब व्यावसायिकांच्या पचनी पडलेली नाही. ही आग लागलीच कशी असा या व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे.
हे ही वाचा - नंदुरबार, सातारा अन् बीड जिल्ह्यात महिला व बालकाच्या विरोधात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

लाखोंचे नुकसान -

या आगीत अनेक सामान्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुढे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे, आता आमचे याच ठिकाणी पुन्हा पुनर्वसन करावे, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत. हा सगळा प्रकार एक षडयंत्र असून याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी हॉकर्स युनियनने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.