पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर Robbery on Pune Solapur Highway इंदापूरजवळ गाडीवर गोळीबार Firing and Looting Pune Solapur Highway करून ३ कोटी ६० लाख रुपये लुटून धूम ठोकणाऱ्या 3 crore 60 lakh rupees robbery Indapur टोळीचा छडा Pune-Solapur highway robbery revealed लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) LCB Pune Rural Police यश आलं आहे. २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 72 तासात तिघांना ताब्यात घेतले. Robbery on Pune Solapur Highway Indapur
गाडी आडवी लावत साडेतीन कोटीचा दरोडा फिर्यादी भावेशकुमार अमृत पटेल ( रा.कहोडा, ता. उंझा, जि.मेहेसाना राज्य गुजरात व्यवसाय करीअर सर्विसिस ) वितरक हे नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेऊन दि. २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी सोलापूर येथून मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. इंदापूर टोल नाका पास करून पुढे वरकुटे पाटी येथील गतिरोधक जवळ गाडीचा वेग कमी झाल्याने पहाटे ०२:३० वा. सुमारास ६ अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गाडीजवळ येऊन त्यांना लोखंडी रॉड दाखवत अडविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांची गाडी भरवाव वेगाने पुढे काढली त्यावेळी त्यांचे गाडीचा दोन चारचाकी वाहनांनी पाठलाग सुरू केला. वरकुटे पाटी पासून पुढे सात ते आठ किलोमीटर अंतरावर पोहोचले नंतर पाठलाग करणारे गाडीतून फिर्यादीचे स्कार्पिओ गाडीवर बंदुकमधून फायरींग करण्यात आली. त्या दरम्यान पाठलाग करणारे एका चारचाकी वाहनाने स्कार्पिओ गाडीला आडवी मारून स्कॉर्पिओ थांबविली. त्यावेळी एकूण सहा अनोळखी इसमानी फिर्यादीस व त्याच्या सोबत इसम नामे विजयभाई सोलंकी यास मारहाण करून फिर्यादीला स्कॉर्पिओ मधून उतरवून त्यांचेकडील दुसऱ्या गाडीत बसविले. त्यानंतर पुढे नेवुन गाडीमध्ये ठेवलेली सर्व रोख रक्कम फिर्यादी व सोबतचे इसमाचे मोबाईल व त्यांचे खिशातील रोख रक्कम असे एकूण तीन कोटी साठ लाख सव्वीस हजार रुपयांचा माल दरोडा टाकून चोरून नेला. त्यानंतर फिर्यादी व चालक यांना स्कॉर्पिओसह स्वामी चिंचोली गावाचे परीसरात सोडून दिले.
आरोपींच्या शोधात पोलिसांची सहा पथके रवाना सोलापूर- पुणे या मुख्य हायवे रोडवर फायरिंग करून दरोड्याचा प्रकार झालेला असल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, यांनी तात्काळ तपासाच्या सूचना व मार्गदर्शन करून गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना केल्या. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन तपास पथके तयार करून त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आल्या होत्या. तसेच इंदापूर पोलीस स्टेशनकडील तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. असे एकूण सहा तपास पथके तयार करण्यात आली होती. बातमीदाराच्या बातमी वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सागर (1) शिवाजी होनमाने, वय ३४ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, (2) बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम, वय ३२ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, (3) रजत अबू मुलाणी, वय २४. वर्षे रा.न्हावी, ता. इंदापूर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली आहे.
1 कोटी 43 लाखांची रोकड जप्त आरोपीकडे केलेल्या अधिक तपासात १) सागर शिवाजी होनमाने याचेकडुन ७२ लाख रूपये रोख २) रजत अबू मुलाणी, याचेकडुन ७१ लाख २० हजार रूपये असे एकूण १,४३,२०,०००/- रूपये जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्हयातील सहभाग असणारे आरोपी नामे गौतम अजित भोसले, वय ३३ वर्षे, रा. वेने, ता. म्हाडा, जि.सोलापुर, किरण सुभाष घाडगे. वय २६ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि.पुणे, भूषण लक्ष्मीकांत तोंडे, वय २५ वर्षे रा. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि.पुणे यांना राजस्थान उदयपुर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा Reward on Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून मिळणार बक्षीस