पुणे : पुण्यातील यवत परिसरात झालेल्या एटीएम चोरी प्रकरणी ( ATM Cash Theft Case Pune ) तीन आरोपींना पकडण्यात यवत व पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं ( ATM Thieves Arrested Pune ) आहे. पकडण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. एक आरोपी पुण्यातून तर दोन वाशीममधून पकडण्यात आलेत.
काय आहे प्रकरण
यवत परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम ( Bank Of Maharashtra ATM Theft Yavat ) तीन दिवसांपूर्वी गॅस कटरच्या साहाय्याने चोरट्यांकडून फोडण्यात आले होते. यात 23 लाखांहून अधिक रोकड लंपास करण्यात आली होती. ती हस्तगत करण्यात आली आहे. याआधीही आरोपींनी अनेक ठिकाणी घरफोडी आणि चोरी केल्याचं उघड झालं. सर्व आरोपी हे मजूर असून यूट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरी करायला शिकले. यातील फरार असलेल्या दोन आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की 17 जानेवारी रोजी रात्री 2.30 ते 4 वाजेच्या दरम्यान यवत गावच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून त्यातील एकूण 23 लाख 80 हजार 700 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी अजय रामेश्वर शेंडे या आरोपीसह त्याच्या इतर 2 साथीदारांना अटक केली असून, आणखीन 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हे सारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर कलम 380 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.