ETV Bharat / city

Pune Police MCOCA Action : अबतक ६४! पुणे पोलिसांचा आणखी एका टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई - Latest Marathi news 6 January

पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार वृषभ उर्फ गुड्या युवराज आल्हाट आणि त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई ( Pune Police MCOCA Action) करण्यात आली आहे. गेली अनेक दिवसांपासून परिसरात अनेक गुन्हे करत सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्या आरोपीवर ही कारवाई ( MCOCA against criminal gang in pune ) करण्यात आली आहे.

Pune Police MCOCA Action
पुणे पोलिसांचा आणखी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई
author img

By

Published : Jan 6, 2022, 1:21 PM IST

Updated : Jan 6, 2022, 1:33 PM IST

पुणे - पुण्यात आणखी एका गुन्हेगाराला पोलीसांनी त्यांचा खाक्या दाखवला आहे अगदी काही दिवसांपूर्वीच एका आरोपीला एमपीडीए लावणाऱ्या विमानतळ पोलीसांनी आणखी एका आरोपीवर मोक्का ( MCOCA -Maharashtra Control of Organised Crime Act ) लावला आहे.

मोक्कांतर्गत कारवाई -

आज पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार वृषभ उर्फ गुड्या युवराज आल्हाट आणि त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात ( MCOCA against criminal gang in pune ) आली आहे. गेली अनेक दिवसांपासून परिसरात अनेक गुन्हे करत सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्या आरोपीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

तीन आरोपींवर कारवाई -

वृषभ उर्फ गुड्या युवराज आल्हाट (वय 24), शंभू बालाजी कावळे (वय 22), करण भाऊसाहेब राखपसरे (वय 22) अशी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी स्वतःच्या टोळीचे वर्चस्व ठेवण्यासाठी विमानतळ, येरवडा व चंदननगर परिसरात दहशत पसरली होती. त्यांनी आजवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. आणि या साऱ्या गुन्ह्यांसाठीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

याआधी देखील अनेक गुन्हे -

या सर्व आरोपींवर या अगोदरही अनेकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. ते सतत गुन्हे करतआहेत अशातच विमानतळ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आणखी एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत या आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या साऱ्या आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत ६४ टोळ्यांवर मोक्का -

दरम्यान पुणे पोलिसांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सांगण्यावरून पुणे पोलीसांनी एकूण ६४ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

हेही वाचा - Pune Police Action on Hotels : पुण्यात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन, मुंढवा परिसरातील चार मोठ्या हॉटेल्सवर कारवाई

Last Updated : Jan 6, 2022, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.