पुणे - पोलिसांच्या दक्ष नजरेतून काहीही सुटत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण, पुणे विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला ( Pune Airport Police Arrested A Gang Of House Burglars) केवळ एका पेनच्या टोपनावर संशय घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 29 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यासह सराफालाही अटक करण्यात आली आहे. गजराज मोतीलाल वर्मा (38, निवारी पानमळा, धायरी वडगाव, मूळ रा. कोट्रिटा, मध्य प्रदेश), गोरे उर्फ गणेश रती राणा (32) आणि शशिकांत भीमराव जाधव (32, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pune Crime News : एका पेनच्या मदतीने पुणे पोलिसांनी लावला 29 लाखांच्या चोरीचा छडा, वाचा ते कसे..! - पुण्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड
कुख्यात गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला केवळ एका पेनच्या टोपनावरून संशय घेत पुणे पोलिसांनी अटक केली. चौकशीनंतर घरफोडीची एक मोठी मालिकाच ( Pune Airport Police Arrested A Gang Of House Burglars) समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास 29 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.