पुणे - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ( Pune Mnc Har Ghar Tiranga initiative ) महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 5 लाख तिरंग्यांचे विनामुल्य ( Har Ghar Tiranga Pune news ) वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रही त्यासाठी करण्यात आली आहेत. आपल्या ध्वजाचा ( Har Ghar Tiranga initiative Pune mnc ) अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराकडून विविध संस्थाच्या माध्यामातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत.
हेही वाचा - Uday Samant Attack Case: उदय सामंत हल्ला प्रकरणी विशाल धनवडे, गजानन थरकुडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर
देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेकडूनही हर घर तिरंगा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी पाच लाख झेंड्यांची खरेदी महापालिका करणार आहे. खरेदी केलेल्या झेंड्यांचे नागरिकांना विनामुल्य वाटप केले जाणार आहे.
महापालिककेड टप्प्याटप्याने झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून झेंड्यांचे वितरण करण्यासाठी तीनशे केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारेही वाटप केले जाईल.
हेही वाचा - Laxman Hake : शहाजी बापू पाटील आणि तानाजी सावंत निवडूण येणार नाही; लक्ष्मण हाकेंचा इशारा