पुणे - ओव्हरहेड वायर लावल्यानंतर त्यातून मेट्रोला वीजप्रवाह प्राप्त होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी मेट्रोची साधारण ५०० मीटरपर्यंत चाचणी घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथे मेट्रोच्या मुख्य मार्गावरून ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे उशीरा का होईना पण अखेर मेट्रो धावली, असेच म्हणावे लागेल.
हेही वाचा... ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा - उपराष्ट्रपती
मेट्रोच्या ओव्हरहेड वायरचे काम जवळपास दीड किलोमीटरपर्यंत झाले आहे. त्याच ओव्हरहेड वायरमधून वीजप्रवाह प्राप्त होतो की नाही, हे तपासण्यासाठी आज मेट्रोची ५०० मीटरपर्यंत चाचणी घेण्यात आली. मात्र मेट्रो खऱ्या अर्थाने आणि अधिक जोमाने कधी धावणार ? हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा... मराठी साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या विरोधात वाटली पत्रके
गेल्या काही वर्षांपासुन पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक काम हे पिंपरी-चिंचवड शहरात झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षात मेट्रोची चाचणी होणार होती. मात्र, तसे घडले नाही. मेट्रोने केवळ फोटोसेशन केल्याचे दिसून आले आणि पुन्हा जैसे थे, तशीच स्थिती होती. मात्र, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये नागपूरहुन मेट्रोची बोगी आणण्यात आली.
हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
त्याच्या नामंतरावरून नंतर पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर बोगी मेट्रोच्या मुख्य मार्गावर आणून ठेवत, दुसऱ्या दिवशी पत्रकारांना बोलावून फोटोशूट करून घेतले. दरम्यान, मेट्रोच्या नावावरून मेट्रोचे संबंधित अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडचे नाव देण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले.