ETV Bharat / city

धक्कादायक..! बायकोचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी सख्ख्या भावाचा खून, मृतदेह शेतात पुरला - पुणे लेटेस्ट क्राईम न्यूज

कधी-कधी माणुसकीला आणि नाते-संबंधांना काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात. मुळशी तालुक्यातील कुळे गावातही अशीच एक घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या सख्ख्या भावाचा खून केला.

Crime
क्राईम
author img

By

Published : Nov 23, 2020, 10:46 PM IST

पुणे - बायकोचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेले अनैतिक संबंध जगजाहीर करेल, अशी भीती वाटल्याने एका व्यक्तीने बायको आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात खड्डा करून त्याचा मृतदेहही पुरला. हा सर्व प्रकार शेतमालकाच्या लक्षात आल्यानंतर आठ दिवसांनी या घटनेला वाचा फुटली. मुळशी तालुक्यातील कुळे गावात ही घटना घडली.
संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा सख्खा भाऊ स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38) आणि विजयकुमार नारायण राठोड (वय 40) या तिघांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कुलकर्णी यांचे कुळे गावात फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर आरोपी स्वामीनाथ, त्याची पत्नी अमृता आणि विजयकुमार केअरटेकर म्हणून काम करत होते. अमृता आणि विजयकुमार यांच्यात मागील अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती अमृताचा पती स्वामीनाथ यालाही होती. दरम्यान मृत संतोष हे दिवाळीनिमित्त अक्कलकोटहून विश्वनाथ याच्याकडे आले होते. यावेळी त्यांना भावजयीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. संतोषने अमृताची समजूत काढत भावाचा संसार उघड्यावर आणू नको असेही ठणकावले होते.

दरम्यान, संतोष गावी गेल्यानंतर आपल्या बायकोचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल, अशी भीती विश्वनाथ याला वाटत होती. त्यामुळे त्याने पत्नी अमृता, तिचा प्रियकर विजयकुमार यांना सोबत घेऊन संतोषला ठार मारण्याचा कट रचला. दिवाळीच्या रात्री (13 नोव्हेंबर) त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला खड्डा करून त्याचा मृतदेह पुरला.

दोन दिवसांपूर्वी फिर्यादी फार्महाउसवर गेले असता त्यांना संतोष दिसला नाही. त्यांनी आरोपींकडे चौकशी केली असता तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी फार्महाऊस भोवती चक्कर मारली असता एके ठिकाणी खड्डा खणल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.