ETV Bharat / city

Pune Job Fraud Cases : पुण्यात जॉब फ्रॉडचे जाळे, एका वर्षात तरुणांना घातला 87 कोटींचा गंडा

author img

By

Published : Jan 22, 2022, 6:39 PM IST

पुण्यात नोकरी लावून देण्याच्या बाहण्यातून युवकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. मागच्या वर्षी पुण्यात जवळपास 823 तरुणांना एकूण 87 कोटी रुपयांचा गंडा ( Pune Job Fraud Cases ) घालण्यात आला आहे. नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देण्याचा बाहाण्याने त्याचबरोबर परदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणुक करण्यात आली आहे.

Pune Job Fraud Cases
पुण्यात जॉब फ्रॉडचे जाळे

पुणे - ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढत असतानाच आता जॉब फ्रॉडचा धोकाही ( Online Job fraud in Pune ) मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तरुणांना नोकरीला लावण्याची आमिष देऊन मोठा गंडा घातला जात आहे. असेच जॉब फ्रॉडचे एक प्रकरण पुण्यात देखील समोर आला आहे. गेल्या एका वर्षाचा विचार करता पुण्यात 800च्या असे फसवणुकीचे गुन्हे ( Pune Job Fraud Cases ) घडले आहेत. ज्यामध्ये जॉब देतो असे सांगणाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पुणे सायबर चे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली आहे.

पुणे सायबरचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची प्रतिक्रिया

गेल्या एका वर्षात पुण्यात 87 कोटी रुपयांची फसवणूक -

पुण्यात नोकरी लावून देण्याच्या बाहण्यातून युवकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. मागच्या वर्षी पुण्यात जवळपास 823 तरुणांना एकूण 87 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देण्याचा बाहाण्याने त्याचबरोबर परदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणुक करण्यात आली आहे.

तीन वर्षात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यात वाढ -

पुण्याला शिक्षणाचे माहेर घर मानले जाते. त्यासाठी संपूर्ण राज्यासह परराज्यातून देखील लाखो तरुण पुण्यात शिक्षणासाठी किंवा नोकरी करण्यासाठी येतात. नोकरी शोधत असताना अनेकजण आपला बायोडाटा हा ऑनलाइन जॉब पोर्टलवर अपलोड करत असतात. याच डाटाचा फायदा घेत हा सगळा फसवणुकीचा कारभार होत आहे. आणि आता या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. जर मागच्या काही वर्षांचा विचार केला तर 2019 मध्ये पुण्यात असे एकूण 425च्या आसपास गुन्हे घडले होते. ज्यात 28 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. तर 2020मध्ये या गुन्ह्यांचा आकडा 775 च्या वर पोहोचला होता. ज्यात देखील 25 कोटी रुपयांची फसवणूक झाली आणि मागील 2021 वर्षी तर हा आकडा 87 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन -

हे सगळे गुन्हे थांबविण्यासाठी युवकांनी आपली शैक्षणिक पात्रता बघूनच नोकरीसाठी आपला बायोडाटा पाठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन नोकरीबद्दल कोणालाही पैसे ना पाठवता अशा कुठल्याच अमिषाला बळी पडू नये असे आवाहन पुणे सायबरचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी केलं आहे.

हेही वाचा - Double Murder in Bhiwandi : भिवंडी हादरली; वृयोवृद्ध पती-पत्नीची निर्घृण हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.