पुणे - शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला ( Shivsena Leader Raghunath Kuchik Rape Case ) होता. त्या पीडित तरुणीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ( Attempt To Suicide Young Woman ) आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने तरुणीला वाचवण्यात यश आले आहे.
जीवे मारण्याची धमकी
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका 24 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यानंतर आरोपीने बळजबरीने गर्भपात करत, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्यावर भादंवि कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, 24 वर्षीय पीडितेने शनिवारी डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये जात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने फेसबुक लाईव्ह सुरु केले होते. त्यामुळे हा प्रकार समजल्यानंतर डेक्कन पोलीस आणि शिवाजीनगर पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पीडित तरुणी सुखरुप असल्याचे लक्षात आले, अ्न पोलिसांनी एकच सुटकेचा निश्वास टाकला. तसेच, पीडित तरुणीची समजूत घालत, याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे तिला सांगितले.
हेही वाचा - E Pass Cancelled : अंबाबाईसह ज्योतिबा मंदिरातील ई-पास सक्ती रद्द; भक्तांची दर्शनासाठी तुडुंब गर्दी