ETV Bharat / city

व्हॅलेन्टाईन डे ला पुण्यातील जोडप्याची अनोखी मोहीम, भारत भ्रमणाद्वारे स्वच्छतेबाबत करतात जनजागृती - पुणे जोडपे स्वच्छता जनजागृती

आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सारे प्रेमी युगुल हे आजच्या दिवशी आपल्या पार्टनरसोबत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात असतात. पुण्यात एक जोडपे हे व्हॅलेन्टाईच्या दिवशी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प घेऊन देशभर भ्रमण करतात व लोकांना स्वच्छेबाबत जागृक करतात.

Pune couple unique campaign on Valentine Day
पुणे राजा नरसिंग स्वच्छता जनजागृती
author img

By

Published : Feb 14, 2022, 5:49 PM IST

पुणे - आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सारे प्रेमी युगुल हे आजच्या दिवशी आपल्या पार्टनरसोबत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात असतात. पुण्यात एक जोडपे हे व्हॅलेन्टाईच्या दिवशी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प घेऊन देशभर भ्रमण करतात व लोकांना स्वच्छेबाबत जागृक करतात.

माहिती देताना राजा नरसिंग आणि त्यांची पत्नी प्रीती राजा नरसिंग आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Chief Minister Uddhav Thackeray : विद्यापीठाने सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसा अभ्यासक्रम राबवावा - मुख्यमंत्री

पुणे येथे राहणारे राजा नरसिंग आणि त्यांची पत्नी प्रीती राजा नरसिंग हे जोडपे प्रत्येक व्हॅलेंन्टाईन डे च्या दिवशी देशातील अस्वछता पुसून टाकण्यासाठी 'थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' ही मोहीम हाती घेत वर्षभर भारत भ्रमण करतात. त्यांनी २०१० साली 'सारे जहा से अच्छा' या नावाने सामाजिक संस्थेची सुरुवात केली. हे दोघे ही सध्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत आहेत.

अशी केली या अनोख्या मोहिमेची सुरुवात

मागील वर्षीच्या व्हॅलेन्टाईन डे ला त्यांनी सुरू केलेली मोहीम आज भारताच्या ७२ शहरांमध्ये पोहोचली असून त्यांनी आतापर्यंत देशभरात १४ हजार किमी चा प्रवास केला आहे. रत्नागिरी, उदयपूर, उज्जैन, कोलकत्ता, विजयवाडा अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ही मोहीम राबवली आहे. त्यांचा पाळीव श्वान देखील त्यांचाबरोबरच या मोहिमेत आहे हे देखील नवलच आहे.

शहरात फिरताना शहरातल्या भिंती पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. या थुंकण्यामुळे पसरणारे जंतू आणि त्याचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम समजावून सांगण्यासाठी हे दोघे संपूर्ण देशात फिरत आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गाडीवर 'अँटी - स्पिटिंग' असे स्टिकर देखील चिकटवले आहेत.

यंदाच्या व्हॅलेन्टाईन डे ला केला हा निर्धार

यंदाच्या व्हॅलेन्टाईन डे ला देखील या जोडप्याने आपली मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यावर्षी ते उत्तर भारतातील ५ राज्यांमध्ये जाणार आहेत. या राज्यांमध्ये जाऊन तिथे जनजागृती करायची तसेच, थुंकण्यामुळे आरोग्यास काय हानी होते, याबद्दल मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.

हेही वाचा - Pune Dada School News : पदपथावर राहणाऱ्या नागरिकांच्या हक्कासाठी जागो नगरसेवक जागो उपक्रम : दादाची शाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.