पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात आज 6 हजार 441 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Pune Corona Update ) आहे. नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
39 हजार 582 सक्रिय रुग्ण - पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. आज शहरात 6 हजार 441 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरा सध्या 39 हजार 582 सक्रिय रुग्ण ( Active Cases in Pune ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दिसेंदिवस वाढ जाणाऱ्या रुग्ण संख्येमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात आता भारत बायोटेकही करणार लस निर्मिती - सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेक पुण्यातील आपल्या मांजरी येथील प्रकल्पात कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणार ( Bharat biotech Covaxin ) आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची गरज भासणार असल्याने पुणे महापालिकेला दररोज सात ते आठ टँकर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.