ETV Bharat / city

Pune Corona Update : शहरात 6 हजार 299 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 17 मृत्यू

पुणे शहरात आज 6 हजार 299 नव्या कोरोनाग्रस्तांची ( Pune Corona Update ) वाढ झाली असून 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात 46 हजार 863 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात शहरातील 5 हजार 375 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 23, 2022, 9:02 PM IST

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात आज ( दि. 23 जानेवारी ) 6 हजार 299 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

46 हजार 863 सक्रिय रुग्ण - पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते.दरोरोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात सध्या 46 हजार 863 सक्रिय रुग्ण ( Active Cases in Pune City ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

5 हजार 375 कोरोनामुक्त - तिसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असली तरी सौम्य लक्षणे दिसत आहेत. दिवसभरात शहरातील 5 हजार 375 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरात आज कोरोनाने 11 मृत्यू झाले असून शहराबाहेरील 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही 46 हजार 863 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.