पुणे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी आम्ही एकत्रच लढू असे अनेक नेते सांगत आहे. असे असले तरी आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुण्यातील महानगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतसुद्धा एकी नाही, असेच दिसत आहे.
पुण्यात शहर काँग्रेसच्या वतीने ( Pune congress meeting update ) बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सगळेच कार्यकर्ते यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांमध्ये असं ठराव करण्यात आलेला आहे की येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढायचे. आघाडी करायची नाही. त्यामुळे यापुढे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एक संघ राहणार ही परत सगळेच स्वबळावर लढणार हे पहाव लागेल पुण्यात मात्र आता काँग्रेसने असा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष ( Pune Municipal Corporation elections ) स्वबळावर लढणार आहे.
पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करा-आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला. शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे ( Arvind Shinde on PMC election ) यांनी तसेच पत्र काढून ही माहिती दिलेली आहे.
भारतीय जनता पक्षच नंबर एक असल्याचा प्रवीण दरेकर यांचा दावा भारतीय जनता पक्षच नंबर एक असल्याचा प्रवीण दरेकर यांनी दावा केला होता. त्यांनी म्हटले होते, की राज्यात महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक पक्ष आपला पक्ष पहिल्या क्रमांकाचा कसा बनेल, यासाठी धावपळ करत आहे. मात्र, त्यांची ही स्पर्धा दोन, तीन आणि चार नंबरसाठी आहे. कारण, राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. म्हणूनच पुण्यात भारतीय जनता पक्षाची पुन्हा सत्ता येईल आणि महापौरांही भारतीय जनता पक्षाचा होईल, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले होते.