पुणे - एसटीचा प्रश्न आता सुटलेला असून अनिल परबांनी समंजस्याची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास पगारवाढ केलेली असून आता त्यांना शेवटची संधी आहे. ३१ मार्चपर्यंत जे येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात बोलताना दिला आहे.
मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. खून तसेच बलात्कार लहान मुलींवर लैंगिक अत्याचार अशा घटना राजरोसपणे पुणे शहरात व पुण्याच्या ग्रामीण भागात घडत आहेत. त्याबद्दल मी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि पुणे शहराची कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या घटनाबाबत वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.
बिबट्या प्रकल्पावरून कारण नसताना राजकारण
२०१६ मध्ये बिबट्याच्या सफारीचा प्रकल्प होणार होता तो बंद झाला होता. अतुल बेनकेंनी त्याबाबत चर्चा केली असून कारण नसताना राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशी टीका देखील अजित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून नेहमी माझी चेष्टा, ही चेष्टा त्यांच्या अंगलट येणार - चंद्रकांत पाटील