पुणे - शहरात ठिक-ठिकाणी श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात देखावे व रोषणाई करण्यात आलेली आहे. Pune Ganeshotsav सदरची रोषणाई व देखावे पाहण्यासाठी शहरातील व शहराबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात, वाहतुकीची काही प्रमाणात ट्रॅफिक तसेच वाहतूक हळू होते. ही गैरसोय टाळणेसाठी नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी अत्यावश्यक वाहने वगळता 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर गर्दी संपेपर्यंत चालणाऱ्यांसाठी एकेरी व दुहेरी मार्ग करण्यात आले आहेत.
पादचारी एकेरी मार्ग - जिजामाता चौक ते रामेश्वर चौक, जाण्याकरिता रामेश्वर चौकाकडून येण्यास बंद असेल, बेलबाग चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ, जाण्यासाठी बाबू गेणू गणेश मंडळाकडून येण्यास बंद असेल, बेलबाग चौक ते गणपती चौक जाण्याकरिता गणपती चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंद असेल, गणपती चौक ते तुळशीबाग गणपती ते काका हलवाई चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ काका हलवाई चौकाकडून तुळशीबाग गणपतीकडे येण्यास बंद असेल, तुळशीबाग गणपती ते जिलब्या मारुती गणपती चौक जिलब्या मारुती गणपती चौकाकडून तुळशीबाग गणपतीकडे येण्यास बंद असेल तर दत्तमंदिर ते क्रांती हॉटेल क्रांती हॉटेलकडून दत्तमंदिरकडे येण्यास बंद असेल.
पादचारी दुहेरी मार्ग - पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक आप्पा बळवंत चौक ते मोती चौक फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज ते गाडगीळ पुतळा चौक फडके हौद चौक ते मोती चौक ते सोन्यामारुती चौक ते शुक्रवारपेठ पोलीस चौकी ते रामेश्वर चौक रामेश्वर चौक ते शनिपार चौकावरील पादचारी एकेरी मार्ग हे बदल फक्त गणपती उत्सव कालावधी पुरते दि. 1 सप्टेंबरपासून गर्दी संपेपर्यंत राहतील.
हेही वाचा - Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या गणेश मंडळांना भेटी, गणरायाच्या आरतीमध्ये झाले सहभागी