पुणे सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाची झडती घेतल्याच्या एका दिवसानंतर सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टिका केली आहे. ते म्हणाले की आम्ही घाबरणार नाही, तुम्ही आम्हाला तोडू शकणार नाही, 2024 च्या निवडणुका आप विरुद्ध भाजप अशा असतील असे सिसोदिया म्हणाले. यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी Sudhanshu Trivedi visit to pune यांना विचारलं असता ते म्हणाले. Prime Minister Narendra Modi ज्या पक्षाने भ्रष्टाचारमुक्त सांगितले होते की आरोप झाल्यावर राजीनामा द्यायला हवा. मात्र आज त्याच पक्षाचे नेते जेलमध्ये आहेत. त्यांना जामीन सुद्धा मिळत नाही. Sudhanshu Trivedi कुठे ना कुठे काही तरी काळ आहे, यांना मोदींशी नाही तर आपापसात लढून, आमच्यात मोठं कोण हे दाखवायचा प्रयत्न करायचा आहे, असा टोला त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.
राष्ट्रीय चारित्र्य या विषयावर प्रमुख वक्ता विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण खा. त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पत्रकारिता आणि राष्ट्रीय चारित्र्य या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. Prime Minister Narendra Modi यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पुस्तके आणि चित्रपट हेही प्रसार माध्यमांचेच अंग स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही, तर जगाला प्रेरणा देण्यासाठी होत आहे. असे देखील यावेळी असे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले आहे. यावेळी खा. त्रिवेदी म्हणाले की हा अमृतकाळाच्या उषःकिरणांचा काळ आहे. आपल्याला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले मात्र स्वत: चे तत्त्व बाकी होते. ते आता साकार होऊ लागले आहे. या काळात प्रचार माध्यमांनी संभ्रम निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात सर्वांचे योगदान होते आणि राजकीय चळवळी, क्रांतिकार्य आणि सैन्य अभियान हे त्याचे 3 अंग होते. मात्र प्रसार माध्यमांमध्ये याला महत्त्व देण्यात आले नाही. पुस्तके आणि चित्रपट हेही प्रसार माध्यमांचेच अंग आहे. या माध्यमांतून भारतीय संस्कृतीच्या विरोधी विचार 3 पिढ्यांच्या मनात रूजवले गेले. मात्र प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या वातावरणावर आता तंत्रज्ञान मात करत आहे.
आपली एकमेव संस्कृती भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणाले, की प्राचीन काळापासून आजपर्यंत अखंड चालत आलेली आपली एकमेव संस्कृती आहे. आपल्यामध्ये एक बहुमीतीय सचेतन मल्टीडिमेंशनल कॉन्शियस ऊर्जा आहे. ती आपल्याला टिकून राहण्यास मदत करते. राजकीय दृष्ट्या जमिनीचा तुकडा कोणाकडेही असला, तरी या राष्ट्राला समाप्त करणे सोपे नाही. आपण जगाला ईश्वराचा मार्गही सुचवू शकतो आणि भौतिक उपायही देऊ शकतो.