ETV Bharat / city

'शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खासगी क्लासेस सुरू करा'

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खासगी क्लासेस सुरू करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केली आहे. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की, शाळा महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर - अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
author img

By

Published : Sep 19, 2020, 5:41 PM IST

पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही, हे आम्ही समजू शकतो. मात्र, त्याला कुठेना कुठे सुरुवात करावी लागेल. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरू करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की, शाळा महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर - अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

हेही वाचा - ...तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते - माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे

कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्व ठिकाणी ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालय चालू करण्याबाबत शासनाने विचार करावा. त्यापूर्वी खासगी क्लासेस चालू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. शंभर विद्यार्थ्यांऐवजी ४० विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. एकदा का राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरळीत चालू झाले की, शाळा महाविद्यालये हा शेवटचा टप्पा असून, ते सहजपणे सुरू करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज्यातील सर्व खासगी क्लासेस नियमावली लावून सुरू केले की, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ते कमी होण्यास मदत होईल. एकदा भीती गेली की, सर्वच गोष्टी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा - मेट्रो 2 ब मधून कुर्ला स्थानक का वगळले? स्थानिक लोकप्रतिनिधींचा एमएमआरडीएला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.