ETV Bharat / city

Pune News : पोलीस कर्मचाऱ्याने दिल्या वरिष्ठांना बदलीच्या हटके स्टाईल शुभेच्छा - Policeman gave a hatak style greeting message

खडक पोलीस स्टेशन मधील ( Khadak Police Station ) एका कर्मचाऱ्याने चीलापी मासे आणायला जाण्यासाठी सुट्टीचा अनोखा अर्ज लिहलेला होता. ते पत्रदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होते. त्यानंतर आता त्याच पोलीस स्टेशनमधील आणखी एका कर्मचाऱ्याच्या हटके स्टाईल शुभेच्छा सध्या व्हायरल होत आहेत. जाणून घ्या काय दिल्या शुभेच्छा.

Hot style messages on WhatsApp
व्हॉट्सअपवर हटके स्टाईल संदेश
author img

By

Published : Sep 15, 2022, 12:26 PM IST

पुणे : पुणे तिथं काय उणे ही म्हणीची प्रचिती वेळोवेळी विविध माध्यमातून येत असते. मध्यंतरी खडक पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने चीलापी मासे आणायला जाण्यासाठी सुट्टीचा अनोखा अर्ज लिहलेला होता. ते पत्रदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होते. त्यानंतर आता त्याच पोलीस स्टेशनमधील आणखी एका कर्मचाऱ्याच्या हटके स्टाईल शुभेच्छा सध्या व्हायरल होत आहेत.

का दिल्या शुभेच्छा : पुण्यातील खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्रीहरी बहिरट यांची भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर हटके स्टाईल आनंद व्यक्त केला आहे.

काय होत्या शुभेच्छा : व्हॉट्सअप मेसेजमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने लिहले आहे की, साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला याचं पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा, सुट्ट्या देत नव्हते. मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो. पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही. तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते. परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील. आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल. कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे. तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब. असा मजकूर या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आहे. त्यानंतर आता या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.