ETV Bharat / city

पुणे महापालिका सीरममधून 25 लाख लस खरेदी करणार, अदर पूनावालांशी चर्चा सुरू

पुण्यात लसींचा तुटवडा होत असल्याने महापालिकेला योग्य नियोजन करता येत नाहीये. त्यामुळे महापालिकेने स्वतः लस खरेदी करण्याचे ठरवले आहे आणि त्याबाबत सिरम इन्स्टिट्यूटसोबत चर्चा देखील सुरू आहे.

Serum Institute,   Serum Institute of India ,  PMC will Buy 25 lac vaccine doses ,  covishield ,  mayor murlidhar mohol ,  पुणे महानगरपालिका ,  महापौर मुरलीधर मोहोळ ,  पुण्यात लसीचा तुटवडा ,  पुणे महापालिका सिरमधून लस खरेदी करणार
महापौर मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : May 11, 2021, 12:53 PM IST

पुणे - शहरात उत्पादित होत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीसाठी सिरम संस्थेचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी संपर्क तसेच पत्रव्यवहार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आम्ही घेऊ पण तुम्ही आम्हाला थेट 25 लाख लस द्या, अशी चर्चा सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यात लसींचा तुटवडा होत असल्याने महापालिकेला योग्य नियोजन करता येत नाहीये. त्यामुळे महापालिकेने स्वतः लस खरेदी करण्याचे ठरवले आहे आणि त्याबाबत सिरम इन्स्टिट्यूटसोबत चर्चा देखील सुरू आहे.

पुणेकरांची गैरसोय -

पुणे शहरात 18 ते 44 वर्षांच्या आणि 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे लसीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीचा हा पुरवठा अनियमित होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला योग्य नियोजन करणे अवघड जात आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जो पर्यंत नियमित लसी मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील, असेही यावेळी महापौर म्हणाले.

सविस्तर माहिती देताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ..

पुण्यात 9 लाख डोस पूर्ण -

शहराची 9 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 1 लाख नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. पुणेकरांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईसाठी थेट जागतिक बाजारपेठेतून करणार लसींची खरेदी - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.