पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना अवघ्या अडीच महिन्यात दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर 42 कारवाया करून अवैध धंदे करणाऱ्यांवर बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. ही जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे सोपविली. त्यांच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यात त्यांनी 42 कारवाया केल्या आहेत. पोलिसांनी छापा टाकून दोन कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आयुक्त कृष्ण प्रकाश 'तो' शब्द खरा ठरवत आहेत
शहरातील अवैद्य धंद्यांचा सुपडा साप करण्याचे काम त्यांनी केले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेला शब्द खरा ठरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला तेव्हाच, अवैद्य धंद्यावाल्यांनी दुसरे काम पाहावे, असे म्हटले होते. त्याचा प्रत्येय सध्या येत आहे, असे म्हणावे लागेल.
हेही वाचा-पुणे : 20 कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचे गुजरात कनेक्शन; वडोदरासह मुंबईमधून सहा जणांना अटक
शहराच्या बाहेरील पोलीस ठाण्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाची नजर!
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव चौकी, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव पोलीस ठाणे, चाकण पोलीस ठाणे याच्यावर विशेष लक्ष आहे. प्रत्येक बारीक हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचे कुबडे यांनी म्हटलं आहे. अवैद्य दारू भट्ट्यांवर अनेक कारवाया केल्याचे त्यांनी सांगितले.
अवैद्य धंद्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी
शहरातील अवैद्य धंदे, मटका, जुगार, पिटा अॅक्ट आणि अवैद्य गुटखा विक्री विरोधात सामाजिक सुरक्षा पथक हे कारवाई करण्याच्या स्थिती आहे. अशा प्रकारचे अवैद्य धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, चाकण परिसरातून 20 कोटींचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले होते. या प्रकरणी गुजरात कनेक्शन समोर आले आहे. वडोदरा येथून तीन आणि मुंबईमधून तीन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे.