ETV Bharat / city

लॉकडाऊनमध्ये चढ्या दराने दारू विक्री; 14 लाखांचा दारूसाठा जप्त

लॉकडाऊनमध्ये चढ्या दराने दारू विक्री केली जात होती. यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.

पुणे
पुणे
author img

By

Published : Apr 23, 2021, 4:31 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - लॉकडाऊनच्या काळात चढ्या दराने दारू विकरणाऱ्या व्यक्तींना भोसरी पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 14 लाखांचा दारूसाठा जप्त केला असून ही कारवाई नाशिक फाटा कासारवाडी येथे करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश किंमतराम आसवानी आणि नामदेव डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

14 लाखांची दारू केली जप्त -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा येथील फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड येथे एक व्यक्ती विदेशी दारू चढ्या दराने विकत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यात तब्बल 14 लाखांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली.

तीन पट दारू विकणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे -

आरोपी नामदेव डोंगरे हा दारूची अवैधरित्या विक्री करत होता. लॉकडाऊन असल्याने तो चढ्या दराने विक्री करत असे. लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक झाल्यानंतर तो तीनपट दराने दारू विक्री करणार होता. अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. ही दारू त्याचा साथीदार प्रकाश आसवानी याच्या मालकीची असून दोघेजण मिळून दारूविक्री करत असल्याने नामदेव याने पोलिसांना सांगितले. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी राजेंद्र राठोड, उमेश देवकर, संजय चव्हाण, अजय डगळे, अनिकेत पाटोळे, सुमित देवकर, गणेश सावंत, समीर रासकर, विनोद वीर, संतोष महाडिक, चेतन साळवे, बाबा जाधव, प्रवीण शिंदे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.