पुणे - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकाच कुटुंबातील 4 महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्व रुग्णांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चार नव्या रुग्णांसह पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32 झाली आहे. त्यापैकी, 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 20 जणांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा... Coronavirus : मृत्यूनंतरही मरणयातना...तब्ब्ल 18 तासानंतर कोरोनाग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु असल्याचे दिसत आहे. शहरातील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. काल रविवारी दिवसभरात एकूण 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी, 4 महिला या एकाच कुटुंबातील असून त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
एकट्या पिंपरी चिंचवड शहरात एकूण 32 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 12 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, 20 रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असून घरात थांबण्याचे आवाहन केले जात आहे.