ETV Bharat / city

लिफ्ट मागताय.. सावधान! लिफ्ट देत एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले

पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्ट दिल्यानंतर एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले.. तक्रारीनंतर देहूरोड पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल..

देहुरोड पोलीस स्टेशन
author img

By

Published : Nov 13, 2019, 11:00 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट देऊन एका व्यक्तीला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. लिफ्ट दिल्यानंतर अज्ञात स्थळी नेत, त्याच्याकडून रोख दहा हजार रुपये, डेबिट कार्ड, मोबाईल फोन तसेच धमकावून डेबिट आणि एटीएम कार्डचा गोपनीय पिन देखील घेतला आहे. या प्रकरणी अशोक महादेव खांडीवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्ट दिल्यानंतर एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले

हेही वाचा... आता सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण अनोळखी ठिकाणी लिफ्ट घेऊन जातो. मात्र, अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागताना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. लिफ्ट मागणे किती महागात पडू शकते याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. फिर्यादी अशोक यांना सकाळी सव्वा सातच्या सुमारास देहूरोड सेंट्रल चौकातून सुसगावकडे जायचे होते. तेव्हा त्यांनी लिफ्ट मागितल्यानंतर एक पांढऱ्या रंगाची कार थांबली. अशोक कारमध्ये बसले, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडील दहा हजार रुपये, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि फोन घेण्यात आला. तसेच कार्डचा गोपनीय पिन देखील घेतला. दरम्यान, अशोक यांचा मोबाईल फोन सिमकार्ड घेऊन त्यांनी परत केला. कारची नंबर प्लेट बनावट आहे, मात्र अज्ञात आरोपी हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

हेही वाचा... लग्नसराईकरता ग्राहकांकडून वाढली मागणी; सोने प्रति तोळा २२५ रुपयांनी महाग

लोकांनी शक्यतो अज्ञात खासगी वाहनाला हात दाखवून थांबवू नये. पिवळी नंबर प्लेट असलेल्या कॅबने शक्यतो प्रवास करावा. तसेच अगोदर खात्री करून नंतरच लिफ्ट मागावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी केले आहे.

Intro:mh_pun_02_av_lift_theft_mhc10002Body:mh_pun_02_av_lift_theft_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट देऊन एका व्यक्ती ला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्याकडून रोख दहा हजार रुपये, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, मोबाईल फोन काढून घेतला. तसेच धमकावून डेबिट आणि एटीएम कार्ड चा गोपनीय पिन देखील घेतला. या घटने प्रकरणी अशोक महादेव खांडीवार वय-३५ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, शक्यतो खासगी वाहनाला हात दाखवून थांबवू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा आपण अनोळखी ठिकाणी लिफ्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मात्र अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागत असताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. लिफ्ट मागणे किती महागड पडू शकत याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात एकाला आली आहे. फिर्यादी अशोक यांना सकाळी सव्वासातच्या सुमारास देहूरोड सेंट्रल चौकातून सुसगावकडे जायचे होते. ते देहूरोड चौकातून सुसगावकडे जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून लिफ्ट घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा, पांढऱ्या रंगाची कार थांबली त्या कार ने अशोक यांना लिफ्ट दिली. अशोक कारमध्ये बसले, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडील दहा हजार रुपये, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि फोन घेण्यात आला तसेच कार्ड चा गोपनीय पिन देखील घेतला. दरम्यान, फिर्यादी अशोक यांचा फोन आरोपी यांनी सिमकार्ड घेऊन परत केला. कार ची बनावट नंबर प्लेट असून अज्ञात आरोपी हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

अज्ञात खासगी वाहनाला हात दाखवून थांबवू नये, शक्यतो पिवळी नंबर प्लेट असलेल्या कॅब ने प्रवास करावा. अगोदर खात्री करून च लिफ्ट मागावी.

मनीष कल्याणकर:- वरिष्ठ पोलीस निरीक्षक (देहूरोड) Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.