पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह ( Pen Drive Case ) बॉम्ब फोडला होता. याप्रकरणात माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे नाव आले होते. त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी त्यांचा तेजस मोरे विरोधात तक्रार दिली होती. मात्र, आता याप्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. तेजस मोरे याने माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण विरोधात पोलिसांत तक्रार दिली ( Tejas More Complaint Against Pravin Chavan ) आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार
माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरेवर आरोप करत तक्रार नोंदवली होती. पण, माझ्या विरोधात खोटे आरोप केले आहे. माझी या प्रकरणात विनाकारण बदनामी केल्याचा आरोप करत तेजस मोरेने प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
प्रवीण चव्हाणांची तेजस मोरे विरोधात तक्रार
फडणवीसांनी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा प्रवीण चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर वकील प्रवीण चव्हाण यांनी फडणवीसांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले होते. तसेच, तेजस मोरे यानेच माझ्या कार्यालयात घड्याळ बसवून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर, चव्हाण यांनी तेजस मोरे विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे