ETV Bharat / city

पीएफआयच्या 'त्या' आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पुणे पोलीस संभ्रमात, देशद्रोहाचे कलम वगळले!

author img

By

Published : Sep 25, 2022, 7:00 PM IST

Updated : Sep 25, 2022, 9:09 PM IST

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. (Pakistan Zindabad Slogan ) त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकरणी पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा प्रकरणात  पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे - पुण्यासह राज्यभरात एनआयए आणि एटीएस कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ पर्वा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Pakistan Zindabad Slogan Video Viral) या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकरणी पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणामुळे वातावरण तापले असताना पुणे पोलीस मात्र संभ्रमात आहेत. काही वेळापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याच स्पष्ट केले. मात्र आता पुणे पोलिसांनी 124 कलम या गुन्ह्यातून हटविल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते कलम लागत नाही. त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुणे पोलीसाकडून देण्यात आली आहे.

कायदेतज्ज्ञांनी ही दिली प्रतिक्रिया - कायदे अभ्यासक असीम सरोदे म्हणाले की, 124 अ कलम हा देशद्रोहाचा कलम असून या कलम बाबत जो याआधी गैरवापर करण्यात आला. याची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आणि न्यायालयाने सांगितले की 124 अ हा कलम लावू शकत नाही. 124 अ हा कलम आवश्यक आहे की नाही याबाबत सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. पूर्वी त्याला राजद्रोहाचा गुन्हा म्हणून ओळखलं जायचे. स्वतंत्र भारत झाले असल्याने त्यात राजद्रोह किंवा देशद्रोह असू शकत नाही. तसेच न्यायालयाने सांगितल आहे की सरकार म्हणजे देश नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष म्हणजे देश नाही. म्हणून 124 अ हा कलम बाबत जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत कलम लावायचे नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसेच जर देशाला काही धोका असेल तेव्हाच हा कलम लावू शकतात, अशी माहिती यावेळी कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी दिली आहे.

पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

चीतावणीखोर वक्तव्य करणे - बंडगार्डन पोलीस ठाण्यात आंदोलनकर्ते 41 लोकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातच याविषयीचे कलम ऍड करण्यात आले आहेत. कलम 153, 124, 109, 120 (ब) हे कलम नव्याने ऍड करण्यात आलेत. कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे कलम 109 चितावणीखोर वक्तव्य करणे. कलम 120 (ब) कट तयार करणे अशा कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 124 देशाबद्दल अपशब्द बोलणे देशद्रोहाचा गुन्हा हे कलम वगळले आहे. बंडनगार्डन पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.

गुन्हा दाखल - हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. तसेच, अनेक सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने देखील या प्रकरणी ज्या कुणी घोषणा दिले असेल त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पार्टी आणि शहरातील तब्बल 27 संघटनांच्या वतीने पुणे पोलिसांना निवेदन देखील देण्यात आल होते. पुणे पोलिसांच्या वतीने या प्रकरणी गुन्हा दाखलल करण्यात आला आहे.

दोन दिवसांत कठोर पाऊल उचलणार - कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या सर्व कार्यकत्यांवर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या संघटनेवर बंदी घालावी. तसेच, कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी मुळीक यांनी केली आहे. यावेळी पोलीस आयुक्तांना आम्ही जी मागणी केली आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत कठोर पाऊल उचलून त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करतील असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचे यावेळी मुळीक म्हणाले आहेत.

व्हिडियोचे फॉरेन्सिक करू - सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. व्हिडियोचे फॉरेन्सिक करून घेण्यात येणार आहे. पोलिसांची हीच भूमिका आहे की यात जे जे समोर येईल त्यानुसार कडक पाऊले उचलली जाणार आहेत. अशी माहिती यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

Last Updated : Sep 25, 2022, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.