ETV Bharat / city

पुण्यात ईदनिमित्त पहिल्यांदाच 'ऑनलाईन' नमाज अदा, ५ हजार नागरिकांनी घेतला लाभ

चंद्र दर्शनानुसार पुण्यात २५ मे रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाते. मात्र कोरोनामुळे सामूहिक नमाजाला परवानगी नाकारल्यानंतर पुण्यात ऑनलाईन नमाज अदा करण्यात आला.

Online
ऑनलाईन नमाज अदा केल्यामुळे मशीदीत असा शुकशुकाट पसरला
author img

By

Published : May 25, 2020, 8:30 PM IST

पुणे - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करण्यात आले. त्यावर उपाय म्हणून पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत ईद नमाजचे'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मशिदीत न जाता घरी मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.

पुण्यात ईदनिमित्त पहिल्यांदाच 'ऑनलाईन' नमाज अदा, ५ हजार नागरिकांनी घेतला लाभ

आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. चंद्र दर्शनानुसार पुण्यात २५ मे रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाते. त्यानंतर मुस्लीम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन यावर्षी मशिदीत जाता येणार नाही, याची कल्पना सर्वाना होतीच. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा सुखद धक्का बसला. आझम कॅम्पस या फेसबुक पेजवर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात आले.

ईदच्या दिवशी सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. मग, ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली. पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.