पुणे - शहरातील एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी (२९ एप्रिल) झालेल्या तपासणीनंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नगरसेविकेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा... पुणे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 1538, तर विभागातील आकडा 1702 वर
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज साधारण ८० ते १०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहेत. भवानी पेठ, ढोले रोड, येरवडा, शिवाजीनगर या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे. पुण्यात काल दिवसभरात ९३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात तब्बल १२७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा १७२२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण ८६ जणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे २३० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाची वाढ झपाट्याने होत आहे, ही बाब सर्वांना काळजीत टाकणारी आहे.