ETV Bharat / city

On Occasion of Ashadi Ekadashi 2022 : आषाढीनिमित्त वारकऱ्यांसाठी टोलमाफी सुरू; वाहतूक पोलिसांकडून विशेष स्टिकर्सची सोय

कोरोनामुळे गेली 2 वर्षे बंद असलेला आषाढी वारी सोहळा ( Ashadi Wari festival ) या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde ) वारकऱ्यांसाठी टोलमाफीचे ( Toll Exemption For Vehicles of Warkari ) आदेश दिले होते. त्याचीच अंमलबजावणी आता तातडीने सुरू झाल्याचे दिसू येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे ( Deputy Regional Transport Officer Pune ) तसेच संबंधित पोलिस स्टेशन येथे त्यासंबंधी सुविधा करण्यात आली आहे.

Toll exemption for Warkaris
वारकऱ्यांसाठी टोलमाफी
author img

By

Published : Jul 9, 2022, 7:37 AM IST

Updated : Jul 9, 2022, 8:22 AM IST

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Wari festival ) पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात ( Toll Exemption For Vehicles of Warkari ) आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली होती. त्यानुसार आता वारकऱ्यांच्या वाहनांचे टोल माफ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसांमार्फत स्टिकर्स लावले जात आहेत. या स्टिकर्सवर वारकऱ्यांच्या प्रवासाचा पूर्ण तपशील असेल. शिंदे सरकारने तातडीने निर्णय घेतल्यामुळे वारकऱ्यांनीसुद्धा या निर्णायाचे स्वागत केले आहे. ( Deputy Regional Transport Officer Pune )

मुख्यमंत्र्यांनी घेतली होती बैठक : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना टोल माफीची घोषणा केली होती. तसेच आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेली दिंडी पुन्हा सुरू झाली असून, यावर्षी पंढरपूरात गर्दी वाढणार आहे. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. या ठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

राज्यभरातील तमाम वारकऱ्यांना टोलमाफी : पंढरपूर याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातून येणाऱ्या तमाम वारकऱ्यांना टोल माफ होणार असल्यामुळे त्याची अंमलबजावणी तातडीने झाली आहे.पुणे येथील परिवहन कार्यालयातून आता त्यासंबंधी पत्रक जारी करण्यात आले असून, सर्व कर्मचाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

वाहनांना स्टिकर व पास देण्याचे आदेश : पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून, त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे तसेच संबंधित पोलिस स्टेशन येथे सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वारकऱ्यांना जाताना येताना होणारा वाहतूककोंडी, कर यातून सुटका होणार आहे. तसेच पंढरपूरला जाताना आणि परत येतानाचे टोल माफ होणार आहेत.

परिवहन अधिकारी यांनी दिले आदेश : पंढरपूरला जाताना आणि येताना १५ जुलै २०२२ पर्यंत या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठीही सुविधा असेल. संबंधितांनी वाहन क्रमांक, चालकाचे नावासह अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याचे ड्रोनद्वार टिपलेले विहंगम दृश्य......

हेही वाचा : Ashadhi Wari 2022 : पंढरपुरात भेसळयुक्त दीडशे किलो पेढ्याचा प्रसाद जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

हेही वाचा : MLA Aditya Thackeray : शरद पवारांनी शिवसेनेला संपवल्याचा आरोप; वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे

Last Updated : Jul 9, 2022, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.