पुणे - पुण्यात गेले दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला दिवाळीत ब्रेक(break to corona deaths in Diwali) लागला आहे. लक्ष्मीपूजनासह दिवाळीतील 5 दिवस पुणे शहरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद (No corona deaths during Diwali in Pune) झाली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी पुणेकरांसाठी काहीअंशी दिलासादायक ठरली आहे. मात्र, दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे दिवाळीनंतर मंगळवारी शहरातील कोरोना रुग्णांनी शंभरी ओलांडली.
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या 7 दिवसांपैकी 1, 2, 4, 5 आणि 7 नोव्हेंबरला शहरात एकही मृत्यू झाला नाही. याच काळात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज होती. त्यामुळे पुणेकरांसाठी यंदाची दिवाळी उत्साहात पार पडली. या दिवाळीत 3 नोव्हेंबरला 3 आणि 6 नोव्हेंबरला 1 अशा चार रुग्णांचा मृत्यू झाला.
हेही वाचा-नवाब मालिकांचा हायड्रोजन बॉम्ब फुसकाच, मलिकांविरुद्ध एक रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार - मुन्ना यादव
दिवाळीनंतर रुग्णांची शंभरी पार
मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु मंगळवारी पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असून शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांत 113 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. कारण, गेल्या वर्षी दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता.
हेही वाचा-अवमान याचिकेवर शुक्रवारपर्यंत एसटी कामगार संघटनेने उत्तर सादर करावे- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
गेल्या दिवाळीत कोरोनाच्या एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू
गेल्या वर्षी दिवाळीत दररोज 7 ते 12 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळी पुणेकरांची चिंतेत गेली होती. गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी होती. या काळात 12 नोव्हेंबरला 15, 13 तारखेला 7, 14 तारखेला 12, 15 तारखेला 5 आणि 16 नोव्हेंबरला 4 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच गेल्या दिवाळीत कोरोनाच्या एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच दररोज शंभर ते दोनशेच्यादरम्यान रुग्णसंख्या वाढत होती. या दिवाळीत केवळ दोन दिवसांत चार रुग्णांचा मृत्यू झाला.
हेही वाचा-Corona Update : राज्यात सोमवारी 1,555 रुग्णांना डिस्चार्ज, 751 नवे रुग्ण तर 15 रुग्णांचा मृत्यू
शहरात सध्या 701 रुग्ण अॅक्टिव्ह
दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 5, 054 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये 35 लाख 90 हजार 799 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 701 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 114 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आशिष भारती यांनी दिली आहे.