पुणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar Murder Case यांच्या हत्येला आज 9 वर्ष पूर्ण झाले असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने Pune Maharashtra Superstition Eradication Committee आज विठ्ठल रामजी शिंदे पुलावर Ramji Shinde Bridge in Pune डाॅ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली, तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन आले.
अनिंसच्या दोन्ही गटांकडून पुण्यात दाभोळकरांना अभिवादन पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती. रोजच्याप्रमणे मॉर्निंग वॉक करीत असताना त्या दरम्यानच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करण्यात येते. यंदा मात्र अनिंसमध्ये दोन गट निर्माण झाल्याने आज दोन्ही गटांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आज सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, डॉ. सदानंद मोरे यांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर वर स्मृती व्याख्यानदेखील आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या समोर सुरू आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामधील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित झाला आहे. आरोपींविरोधात युएपीए कायद्यांतर्गत खटला चालावा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आलेली होती. राज्य सरकारकडून युएपीए कायद्यांतर्गत खटल्याला परवानगी देण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाली आहे.