ETV Bharat / city

NIA Raid PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पीएफआय विरुद्ध विविध राज्यात छापेमारी; 106 जणांना अटक - financial support to terrorists

राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज सकाळपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र (NIA Raid PFI) सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या (NIA Maharashtra, UP, Delhi Raid) आणि विविध राज्यातून 106 लोकांना अटक केले (NIA Arrested 106) आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक अटक कारवाई (NIA raid in Maharashtra, Kerala, Karnataka) करण्यात आल्या आहेत. मुंबईतून एटीएसने पीएफआयच्या पाच सदस्यांना अटक ( Mumbai ATS PFI Member Arrested) केली आहे. पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय)  मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयए ने छापेमारी सुरू केली (NIA raids PFI head office in Pune) आहे.

NIA raids PFI head office in Pune
पुण्यात पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर एनआयएची छापेमारी
author img

By

Published : Sep 22, 2022, 10:14 AM IST

Updated : Sep 22, 2022, 6:11 PM IST

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज सकाळपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र (NIA Raid PFI) सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या (NIA Maharashtra, UP, Delhi Raid) आणि विविध राज्यातून 106 लोकांना अटक केले (NIA Arrested 106) आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक अटक कारवाई (NIA raid in Maharashtra, Kerala, Karnataka) करण्यात आल्या आहेत. मुंबईतून एटीएसने पीएफआयच्या पाच सदस्यांना अटक ( Mumbai ATS PFI Member Arrested) केली आहे. तसेच एनआयएने ट्रॉम्बे परिसरात छापा टाकून एका पीएफआयच्या सदस्याला अटक केली आहे.

राज्यांमध्ये ईडी, एनआयए आणि पोलिसांची संयुक्त छापेमारी- टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याच्या आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांत एनआयएने या प्रकरणात एक डझनाहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पीएफआयशी संबंधित धागेदोरे सापडले होते. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी पीएफआयशी संबंधित १०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचा प्रमुख परवेझ अहमद याच्याही एनआयएने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत. एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएला मोठ्या प्रमाणात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्याआधारावर तपास यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली. १० हून अधिक राज्यांमध्ये ईडी, एनआयए आणि पोलिसांनी १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. पीएफआयशी संबंधित लोकांच्या प्रशिक्षणाच्या हालचाली, टेरर फंडिंग आणि लोकांना संघटनेशी जोडण्याविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

NIA raid
पुण्यात पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर एनआयएची छापेमारी

पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी - देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे पीएफआय या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. त्याच अनुषंगाने आज पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एनआयए ने गुरुवारी सकाळी नेरूळच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. देशभरात हे छापे सुरु असून या संस्थेकडून दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणी एनआयएने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या माहितीवरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संस्थेकडून दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याची माहिती समोर आल्याचे समजते. त्या आधारे पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी सुरु आहे. या संस्थेचे नेरुळ सेक्टर 23 येथे देखील कार्यालय आहे. त्याठिकाणी एनआयएने गुरुवारी सकाळी छापा टाकला. त्यामध्ये कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एटीएसचे छापे - महाराष्ट्र एटीएसने पीएफआयविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हेही दाखल केले आहेत. महाराष्ट्र एटीएसचे छापे देखील आज संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी पर्व, मालेगाव, मुंबई नवी मुंबईचा समावेश आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मौलाना सैफुर रहमान याला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफुर रहमान हे पीएफआयचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत.

औरंगाबादमधूून चौघे ताब्यात - औरंगाबाद येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची संबंधित असलेल्या चार जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शहरातील विविध भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागामधील एटीएसटी कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर रात्रीपासून औरंगाबाद शहरात पुणे व मुंबई येथील एटीएसचे पथक औरंगाबाद दाखल झाले होते. औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही संमिश्र कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये टोमॅटो डिलिव्हरी बॉय असलेला व पूर्वी पीएफआयशी संबंधित असलेला सय्यद फैसल याला हडको भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर इमरान मील्ली याला किराडपुरा भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोघांपैकी एक जण हा औरंगाबाद येथील रहिवासी असून इतर जिल्ह्यात झाला होता. त्याला देखील ताब्यात घेतले आहे. या चौघांची चौकशी सध्या औरंगाबादमध्ये सुरू आहे.

पुण्यातही धडक कारवाई - पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयएने छापेमारी सुरू केली (NIA raids PFI head office in Pune) आहे. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले. आज सकाळी पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथील पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी करत काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी देखील दाखल झाली आहे.

पीएफआय अध्यक्षांच्या घरावर छापा- मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पीएफआय अध्यक्षांच्या घरावर ओएमए सलाम यांनी छापा टाकला. यावेळी पीएफआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आज सकाळपासून पुण्यातील कोंढवा येथे देखील ही छापेमारी सुरू आहे. कोंढवा येथील कौसरबाग मशिदीजवळील कोंढवा येथील पीएफआयचे राज्य कार्यालय आहे.या कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे. तसेच छापा टाकून काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

छाप्यात पीएसआयच्या कार्यालयातील साहित्य जप्त - आज पीएफआयचे टेरर फंडींग, संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग या सर्व बाबींविषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या कार्यालयावर टाकले छापे आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडीदेखील दाखल झाली आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस , जीएसटी आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकलेत. या छाप्यात पीएसआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आलंय. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. पीएसआयचं महाराष्ट्र मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात (NIA raids PFI head office) आहे. एनआयएने आतापर्यंत पुणे, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. या छाप्यात आतापर्यंत एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

NIA चा सर्वात मोठा छापा - अधिका-यांनी सांगितले की छाप्यादरम्यान NIA, ED ने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) च्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अधिकार्‍यांच्या मते, हे छापे प्रामुख्याने दक्षिण भारतात टाकले जात आहेत. एनआयएने याला “आतापर्यंतची सर्वात मोठी तपास कारवाई म्हटले आहे. एनआयएने सांगितले की, दहशतवाद्यांना कथितपणे निधी पुरवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.

पीएएफआयने दिली प्रतिक्रिया - पीएफआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. राज्य समिती कार्यालयावरही छापे टाकण्यात येत आहेत. आंध्र प्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, कर्नाटकातून 20, केरळमधून 22, मध्य प्रदेशातून 4 महाराष्ट्रातून 20 जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन येथेही एनआयएचे छापे पडले असून त्यात पीएफआयच्या राज्य नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एनआयएने मध्य प्रदेशातील उज्जैन, इंदूर येथून 4 नेत्यांना ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातील तळांवरून टेरर फंडिंग खाते, साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.