पुणे - राज्यात वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यात आज गुरुवारी राष्ट्रवादीकडून मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्यात आले. यात राज्य सरकारविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar criticized Shinde government Vedanta project ) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होतं. हे दुर्दैवी आहे. वेदांत प्रकल्प आता महाराष्ट्रात येणं शक्य नाही. ठाकरे सरकार याचं खापर फोडणं अयोग्य आहे. मंत्री आता सांगतायत की, आम्ही यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
मोदी शहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना 'वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापले आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प जर आत्ता गुजरातला गेला आहे. तर मग कशाला चर्चा करायची ? हा प्रकल्प तळेगांव येथे येणार होता. यावर त्याची चर्चा देखील झाली होती. राज्य सरकारने यासाठी आवश्यक पूर्तता देखील केली होती. पण आज हा प्रकल्प राज्यातून गेला आहे, त्यामुळे यावर चर्चा करू नये. असं यावेळी पवार ( NCP chief Sharad Pawar criticized Shinde government over Vedanta project pune ) म्हणाले.
केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पावरून महविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. यावर पवार म्हणाले की, गम्मत अशी आहे की- हे दोन्ही त्यावेळेस मंत्री होते. त्यामुळे मंत्रिमंडळात काय निर्णय झाले ? हे त्यांनाच माहीत आहे. तसेच मुख्यमंत्री यांची पंतप्रधान यांच्याशी चर्चा झाली. यावर पवार म्हणाले की, लहान मुलाची समजूत जशी काढली जाते, तशी समजूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची काढली आहे. असा टोला देखील यावेळी पवार यांनी शिंदे यांना लगावला. केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे होत असतात. याचा लाभ जर गुजरातला मिळत असेल तर आपण तक्रार करून काहीही होणार नाही. केंद्रात मोदी आणि अमित शहा हे सत्तेत आहे. आपण पाहिलं तर कुठल्याही माणसाला आपल्या घरची जास्त ओढ असते, असं देखील यावेळी पवार ( NCP chief Sharad Pawar Vedanta project ) म्हणाले.
बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आमिष हे रडणाऱ्या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं त्याचबरोबर, नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली, तर त्यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करू असेही शरद पवार म्हणाले. पण सध्याच्या स्थितीवरून असं दिसतंय की, हा प्रकल्प महाराष्ट्रात येणं शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आमिष हे रडणाऱ्या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे, असा टोला पवारांनी लावला आहे. मोदी शहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना होतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे गुजरातमध्येच सर्वांत जास्त दौरे झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील ? यावर सरकारने लक्ष द्यावं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.