पुणे - जायकाच्या ( MP Girish Bapat talk on jaika ) कामांसंदर्भात महापालिका आणि आयुक्तांनी आत्तापर्यंत मला एकदाही माहिती दिली नाही. मात्र, जायकाचा पाठपुरावा चालू आहे आणि महापालिका देखील गतीने काम करत आहे. जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकार पुण्याला निधी देण्यास उत्सुक आहे, अशी जाहीर नाराजी आयुक्त आणि महापौर यांच्यासमोरच खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - पोलीस असल्याचे सांगून दागिने लंपास करणारी टोळी गजाआड; 6 लाखांचे सोने केले जप्त
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली. आळंदी हे महाराष्ट्रातील मुख्य तीर्थक्षेत्र. आळंदीसाठी ( MP Girish Bapat talk on alandi ) पाणी देण्यास निर्णय झाला आहे आणि हे पाणी महानगरपालिकेच्या पाईपलाईनद्वारे दिले जाईल. कोरोनाच्या काळामध्ये थोडेफार काम रखडले होते. महापालिका आयुक्तांनी त्यात लक्ष घालून काम पूर्ववत केला आहे. यामुळे जवळजवळ तीन टीएमसी पाणी वाचणार आहे.
कालवा बंद करण्याचा विषयाची नुसती चर्चा झाली. त्याचा बजेट खूप मोठा आहे, मात्र त्याच्याबद्दल निर्णय झाला नाही. पुणेकरांचे पाणी कमी होणार नाही आणि शेतकर्यांना दोन आवर्तने पाणी मिळेल. महापालिकेने 34 गावे समाविष्ठ झाल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. महापालिका सध्या जेवढे पाणी वापरत आहे त्यावर ती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शहराचे पाणी कमी न होता शेतीसाठी दोन आवर्तने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar forget CM name : जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार विसरतात मुख्यमंत्र्यांचं नाव