ETV Bharat / city

पुण्यात वर्षभरात 20 हजार बालके कोरोना संसर्गित; सध्या 54 बालकांवर उपचार सुरू

author img

By

Published : May 28, 2021, 5:33 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अशातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुणे महापालिकेच्या वतीने तिसऱ्या लाटेसाठी विशेष तयारी केली आहे.

आरोग्य प्रमुख पुणे महापालिका
आरोग्य प्रमुख पुणे महापालिका

पुणे - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पुण्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पुण्यात कोरोनाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 9 मार्च 2020 ते आतापर्यंत 1 ते 10 वर्षे वय असलेल्या 20 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 ते 20 वर्षे वयोगटातील 32 ते 33 हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सध्या 1 ते 10 वर्षातील फक्त 54 लहान बालके तर 11 ते 20 वयोगटातील 72 मुले पुण्यात उपचार घेत आहे.

पुण्यात 20 हजारांपेक्षा अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण, सध्या 54 मुलांवर उपचार सुरू

लहान मुलांमध्ये लक्षणे अतिसौम्य
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अतिसौम्य प्रमाणात दिसून आली आहे. त्यामुळे पुण्यात जास्तीत जास्त मुले ही होम आयसोलेशनमध्येच आहे. मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या आजाराचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये अतिशय कमी प्रमाणात आहे. ज्यांना अ‍ॅडमिट किंवा आयसीयूची गरज भासली आहे. अशा मुलांची संख्या खूपच कमी प्रमाणात आहे. मात्र असे असले तरी पुणे महापालिकेच्या वतीने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

तिसऱ्या लाटेसाठी विशेष तयारी
पुणे शहरात कोरोनाच्या पाहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दुसऱ्या लाटेत कुठे ऑक्सिजनसाठी, तर कुठे रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागले. तर काही रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अशातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुणे महापालिकेच्या वतीने तिसऱ्या लाटेसाठी विशेष तयारी केली आहे. महापालिकेच्या वतीने स्वतःच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आले आहे. तर येरवडा येथे लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर देखील उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर राजीव गांधी रुग्णालयात देखील 200 बेडचे पेडियाट्रिक कोविड रुग्णालय देखील चालू करण्यात येणार आहे, असेही यावेळी डॉ. वावरे म्हणाले.

हेही वाचा - राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.