ETV Bharat / city

Hanuman Chalisa Row : अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन समोर भोंगे लावू; पुण्यात मनसेचा थेट पोलीसांनाच इशारा - मशिद भोंगा वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिलेला भोंग्यांचा अल्टिमेट ३ तारखेला ( Maharashtra Loudspeaker Controversy ) संपल्या नंतर ४ मे रोजी मनसेनं राज्यभर आंदोलन करत हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Row ) करत मंदिरांमध्ये महाआरती केली आहे. हे आंदोलन अद्यापही सुरू आहे. दरम्यान, पुण्यात तर मनसेने ( Pune MNS Wrote Letter To Police ) याबाबत चक्क पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे.

Hanuman Chalisa Row
Hanuman Chalisa Row
author img

By

Published : May 6, 2022, 7:33 PM IST

Updated : May 6, 2022, 7:40 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिलेला भोंग्यांचा अल्टिमेट ३ तारखेला ( Maharashtra Loudspeaker Controversy ) संपल्या नंतर ४ मे रोजी मनसेनं राज्यभर आंदोलन करत हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Row ) करत मंदिरांमध्ये महाआरती केली. यात अनेक कार्यकर्त्यांना अटक देखील झाली. त्याच दिवशी दुपारी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी हे भोंग्यांच आंदोलन असंच सुरू राहील, असा इशारा देखील दिला होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आता महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. मात्र, पुण्यात तर मनसेने ( Pune MNS Wrote Letter To Police ) याबाबत चक्क पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. आमच्या मागण्याचा विचार करून पोलिसांनी मौलवीच्या मध्यस्थीने ग्वाही द्यावी, अन्यथा आम्हाला पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल, असा इशाराचे मनसेने पुणे पोलिसांना दिला आहे.

प्रतिक्रिया

काय आहे पत्रात? - राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यावरून मशिदींवरील भोंग्यांबाबत जे आंदोलन सुरु झाले आहे, ते पुढे चालूच राहील, अशी भूमिका राजसाहेबांनी घेतली आहे. या भूमिकेचे संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे शहर व जिल्हा बांधील आहे. भोंगा हा सामाजिक विषय आहे व आम्हालाही धार्मिक तेढ निर्माण करावयाची हौस नाही. परंतु आम्ही आमच्या भूमिकेपासून फारकत घेऊ शकत नाही व त्यामुळेच या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याकडे मागणी करते की, संपूर्ण पुणे शहरात साधारणपणे ४०० ते ४५० मशिदी अस्तित्वात आहेत. जवळपास सर्वच मशिर्दीवरील भोंगे अनाधिकृत आहेत. ते भोंगे उतरवावेत अथवा ते कायम स्वरूपी बंद अवस्थेत ठेवावेत. जेणेकरुन यावरुन मोठ्या आवाजात बाहेर पडणाऱ्या अजानचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होणार नाही. अजानला आमचा विरोध नाही, परंतु ती भोंग्याद्वारे करावयाची नाही यावर आम्ही ठाम आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

'अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा'- पुण्यातील सर्व मशिदींचे जे मौलवी आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीसांच्याच मध्यस्थीने आम्हाला पोलीसांमार्फत लेखी स्वरुपात ग्वाही देऊन कळवावे की आमच्या मशिदीवरून भोंग्याद्वारे अजान केली जाणार नाही. या पद्धतीने ग्वाही मिळाल्यास धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्न उरणार नाही व आमच्यासह ते सुध्दा कायद्याला बांधील राहतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तर या मागणीचा तत्काळ विचार करुन मौलवींकडून पोलीसांच्या मध्यस्थीने अशा स्वरुपाची ग्वाही देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आम्हाला आपल्या पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल, असा इशारा थेट मनसेने पुणे पोलीसांना दिला आहे.

हेही वाचा - High Court decision : मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

Last Updated : May 6, 2022, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.