ETV Bharat / city

MNS Pune : वसंत मोरेंच्या 'त्या' खंद्या शिलेदाराने केला मनसेला 'जय महाराष्ट्र'! - निलेश माझीरे मनसेला सोडचिठ्ठी

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( Former MNS city president Vasant More ) आणि पक्षातील शहरातील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. माझे पक्ष सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर ( MNS Pune city president Sainath Babar ) आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर ( Babu Wagaskar Secretary General MNS ) तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य यांच्यामुळे मी पक्ष सोडत असल्याचे निलेश माझीरे ( Nilesh Mazhire MNS ) यांनी सांगितले आहे.

MNS Pune
MNS Pune
author img

By

Published : Jun 6, 2022, 4:52 PM IST

Updated : Jun 6, 2022, 5:02 PM IST

पुणे - पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या निर्णयाने मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( Former MNS city president Vasant More ) आणि पक्षातील शहरातील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. माझे पक्ष सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर ( MNS Pune city president Sainath Babar ) आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर ( Babu Wagaskar Secretary General MNS ) तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य यांच्यामुळे मी पक्ष सोडत असल्याचे निलेश माझीरे ( Nilesh Mazhire MNS ) यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना निलेश माझीरे

'...म्हणून केला जय महाराष्ट्र' : 19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्या. त्यानंतर माझीरे यांची हकालपट्टी करा, असे साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का ? अशी विचारणा केली होती. ही हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केला आहे. मुळात मी वसंत मोरे समर्थक असल्याने माझे माथाडी कामगार सेनेच शहराध्यक्ष पद काढून घेतले का ? असा सवाल यावेळी माझीरे यांनी विचारला आहे. पुणे मनसेत गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून मनसेत कुरबुरी असल्याच्या चर्चा समोर येतच असतात. त्यातच आता अजून एक भर पडली आहे. निलेश माझीरे पक्षांतर्गत गटबाजीला आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकला आहे.

हेही वाचा - Supriya Sule On BJP Govt : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदान परवानगी याचिकेवर निर्णय नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 108 वेळा छापे तरीही...

Last Updated : Jun 6, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.