पुणे - पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्तांनी एनआयए टाकलेल्या छाप्याविरोधात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा,( Pakistan Zindabad slogans in Pune ) दिल्या होत्या. त्याविरोधा देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आक्रमक पवित्रा घेतला असून ( MNS Protest PFI ) जोरदार निदर्शने ( MNS protest against Popular Front of India ) करण्यात येत आहे.
दरम्यान, देशभरातील 11 राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) अर्थात पीएफआय या संघटनेच्या कार्यलायांवर एनआयए, एटीएसच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात काही लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ काल पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या आंदोलन ( Popular Front of India protested in Pune ) करण्यात आल होते. आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल (Case registered against PFI Activists in Pune ) केले आहेत.