ETV Bharat / city

Corona: आमदार सुनील कांबळेंकडून सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास 50 लाख रुपयांचा निधी - mla sunil kamble gave fifty lakh to hospital for combat corona

पुणे शहरात सध्या कोरोनाबाधित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच बरोबर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन आमदार सुनील कांबळे यांनी लष्कर भागातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास आयसीयू तसेच इतर साधन सामग्री खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये निधी दिला आहे.

mla sunil kamble gave fifty lakh to hospital for combat corona
Corona: आमदार सुनील कांबळेंकडून सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास 50 लाख रुपयांचा निधी
author img

By

Published : Apr 9, 2020, 12:35 PM IST

Updated : Apr 9, 2020, 3:04 PM IST

पुणे - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासठी विविध स्तरावर उपाययोजना चालू आहेत.पुणे शहरात सध्या कोरोनाबाधित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच बरोबर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी लष्कर भागातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास आयसीयू तसेच इतर साधन सामग्री खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये निधी दिला आहे.

Corona: आमदार सुनील कांबळेंकडून सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास 50 लाख रुपयांचा निधी

पुणे शहरातील पूर्व भागातील कॅम्प तसेच मध्यवस्तीमध्ये, झोपड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आमदार सुनील कांबळे यांनी पाठपुरावा चालू केला आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयातील नवीन इमारत कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यासाठी विविध स्तरावर ते पाठपुरावा करत आहेत. ससूनमध्ये नवीन कोरोना विभाग सुरू व्हावा म्हणून प्रयत्नशील असून तो लवकरच सुरू होईल, असे आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले आहे.

मतदारसंघातील झोपडपट्टी, कामगार, मजूर ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजू आणि वंचित समाजाला आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पाच किलो गहू, तांदूळ, डाळ आणि तेल घरपोच दिले जात आहे .

Last Updated : Apr 9, 2020, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.