पुणे- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा खरेदीसाठी शुभ मानला जातो. दसऱ्यानिमित्त बाजारपेठा ग्राहकांसाठी सज्ज झाल्या आहेत. आवक कमी झाल्याने बाजारात एक किलो झेंडूला 150 रुपये भाव मिळत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आणि टाळेबंदीमध्ये पाच महिने बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. नवरात्रोत्सव आणि दसरा सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. मंडईतील बाजापेठेत दसऱ्यानिमित्त झेंडूची फुले घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यंदा पावसामुळे झेंडूच्या फुलांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या महात्मा फुले मंडईत एक किलो झेंडूचा भाव 150 रुपये आहे. भाव जास्त असल्याने ग्राहकदेखील कमी प्रमाणात फुले खरेदी करत आहेत.

गर्दीने बाजारपेठा फुलल्याने व्यापारीवर्गातून समाधान-

यामुळे झेडूंच्या किमतीत वाढ-
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटकाही झेंडूच्या फुलांना बसला आहे. आवक कमी झाल्याने झेंडूच्या फुलांच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात ४० टक्क्यांहून अधिक आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला बाजारात चांगली गर्दी होती. दसऱ्यानिमित्त ग्राहकांकडून खरेदी होणार असल्याने बाजारात आणखी गर्दी वाढणार आहे. मागील ३ दिवसांपासून फुलांना बाजारात चांगलीच मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.