ETV Bharat / city

कोरोना काळात 70 टक्के आयटी कर्मचाऱ्यांनी सोडल्या सदनिका, मूळ गावातूनच 'वर्क फ्रॉम होम' - corona lockdown effect on Hinjewadi IT parks

हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या आयटी अभियंत्यांनी भाडे तत्त्वावरील सदनिका रिकाम्या केल्या आहेत. एकूण 70 टक्के आयटी अभियंते आपल्या मूळ गाव, शहरातून (राज्यातून) काम करत असल्याचे आयटी कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसूरे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले आहे.

Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क
author img

By

Published : Aug 6, 2020, 6:11 PM IST

पुणे - गेल्या साडेचार महिन्यांपासून आयटी क्षेत्रात काम करणारे अभियंते हे वर्क फ्रॉम होम करत असून अनेकजण मूळ गावातूनच काम करत आहेत. त्यामुळे हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या आयटी अभियंत्यांनी भाडे तत्त्वावरील सदनिका रिकाम्या केल्या आहेत. एकूण 70 टक्के आयटी अभियंते आपले मूळगाव, शहरातून (राज्यातून) काम करत असल्याचे आयटी कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसूरे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले आहे.

पाहा आयटी क्षेत्राशी निगडीत कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया...

दरम्यान, कुटुंबासोबत मिळणारा वेळ आणि वर्क फ्रॉम यामुळे कंपनीला मोठा फायदा झाल्याचे आयटी कर्मचारी सांगतात. अशीच परिस्थती किमान येणाऱ्या मार्च 2021 आर्थिक वर्षांपर्यंत सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. एरवी, वाहतूक कोंडीमध्ये अनेक आयटी कर्मचारी गुदमरून जायचे. आता तोच वेळ कामात वापरल्याने त्याचा कंपनीला फायदा होत आहे. गाव खेड्यातून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची वेगळीच बाब आहे. थोडा विजेचा लपंडाव होत असला तरी काम करून थकवा आल्यानंतर घराबाहेर पडताच निसर्गाचे सौंदर्य पाहता पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते, असे अहमदनगर जिल्ह्यातील नितीन याने सांगितले.

हेही वाचा - कोरोनाचा विळखा घट्ट... नव्या 56 हजार 282 रुग्णांची नोंद, तर 904 जणांचा बळी

अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसूरे म्हणाले, स्थानिक गुंतवणूकदारांनी संगणक अभियंत्यांना अनेकांनी भाडे तत्वावर फ्लॅट दिले होते. मार्च महिन्यातील कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास मुभा दिली असून डिसेंबर महिन्यापर्यंत हे चालेल. दरम्यान, आर्थिक वर्ष मार्चपर्यंत राहण्याची शक्यता जास्त आहे. अनेक कर्मचारी पुणे, हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड सोडून आपल्या मूळ गावी गेलेले आहेत. त्यामुळे भाडेतत्वावर घेतलेल्या सदनिका रिकाम्या झाल्या आहेत. 70 टक्क्यांपर्यंत याचा परिणाम जाणवत आहे.

पीजीदेखील ओस पडलेले आहेत. 20 टक्के कर्मचारी तिथे राहत आहेत, असे ते म्हणाले. सध्या टॉप 5 आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली नाही. स्टार्टप कंपन्यांना आलेल्या अडचणीमुळे बंद पडल्या असून बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दरवर्षी वार्षिक अहवाल पाहून 5 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - आरबीआयकडून 4 टक्के रेपो दर 'जैसे थे'; कर्जाच्या पुनर्रचनेला बँकांना परवानगी

पुणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचे आयटी कर्मचारी हे ग्रामीण भागातून सॉफ्टवेअरचे काम करत आहेत. अगोदर असा भ्रम होता की, ग्रामीण भागातून हे काम करता येणार नाही. परंतु, इंटरनेटचे जाळे अवघ्या महाराष्ट्रात पसरल्याने हे शक्य झाले आहे. आमच्याकडील सर्वच कामगार सदनिका रिकाम्या करून (मूळ गावी) घरी गेले आहेत. घरातून वर्क फ्रॉम होम करत असल्याने चांगले काम होत असून याचा कंपनीला फायदा होत आहे. कुटुंबासोबत असल्याने सुट्टी घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत, असे रोज लँड सोसायटीचे अध्यक्ष आणि सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष मस्कर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.