ETV Bharat / city

SSC Result 2021 : दहावीत यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, येथे बघा तुमचा निकाल

यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के इतका लागला आहे. सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच १००% इतका असून सर्वात कमी ९९.८४% निकाल नागपूर विभागाचा आहे. निकालात यंदाही विद्यार्थीनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे.

दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभाग राज्यात अव्वल

author img

By

Published : Jul 16, 2021, 12:37 PM IST

Updated : Jul 16, 2021, 1:25 PM IST

पुणे : इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या शैक्षणिक वर्षानंतर परीक्षेशिवाय अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार केलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे.

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच १००% इतका असून सर्वात कमी ९९.८४% निकाल नागपूर विभागाचा आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८२ हजार ८०२ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२ हजार ६७४ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ७४६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९०.२५ आहे.

यंदाही विद्यार्थीनींचीच बाजी

निकालात यंदाही विद्यार्थीनींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ % जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % इतका लागला आहे.

२७ विषयांचा निकाल १००%

एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

२२३८४ शाळांचा निकाल १००%

राज्यातील २२७६७ शाळांतून १६ लाख ५८ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे. सन २०२१ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत ४.६५% जास्त आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २८४२४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.४५ आहे. 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासाठी विशिष्ट पद्धत तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा - दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

Last Updated : Jul 16, 2021, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.