पुणे - आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत हे स्वीकारल पाहिजे. विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहे. विनायक राऊत यांनी कितीही टीका केली, तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही. कारण ती आपली संस्कृती नाही, असे माजी मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं ( Uday Samant On CM Eknath Shinde ) आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'शिंदे आणि ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर...' - उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून 18 जुलै रोजी पुणेकरणांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेला पुण्यातील कार्यकर्त्यांकडून मोठे समर्थन मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचे असेल, तर त्याबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केलं.
'शिवसेना फुटली अस होत नाही' - होय आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत. पण, हे जे काही नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत ते शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी. रत्नागिरीतही 18 नगरसेवक मला भेटले आणि त्यांनी शिंदे साहेबांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. याचा अर्थ शिवसेना फुटली असा होत नाही. तसेच, कुणाला कोणते पद द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. विरोधकांच्या टिकेवरून एकनाथ शिंदे यांचं भाजपकडून खच्चीकरणं होतय, असं मला वाटत नाही. माइक आणि चिठ्ठीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः खुलासा केला आहे. शिवसेना प्रवक्ता दीपक केसरकर आणि राणे यांच्या होणाऱ्या टिके बाबत सामंत यांनी विनोदाचा रंग दिला. सिंधुदुर्ग ही मनोरंजन नगरी असल्याचे सामंत यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : 'राजकारणात गिफ्ट नाही, सरप्राईज गिफ्ट असतं, मेटेंनाही मिळेल'