पुणे - महाराष्ट्रात कलम 370 चा काय उपयोग, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. मात्र, ज्या मातांची मुलं जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हुतात्मा झाली; त्यांना हा प्रश्न विचारा, असा सल्ला लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी दिला आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या 'कलम 370 व लडाख केंद्रशासित प्रदेश' या चर्चासत्रात ते बोलत होते. तसेच फुटीरतावाद्यांना जात असणाऱ्या करदात्यांच्या पैशाबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट उपस्थित होते.
-
एक चर्चा, धारा ३७० और लद्दाख पर"
— Jamyang Tsering Namgyal (@MPLadakh) October 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
लद्दाख के प्रसिद्ध युवा एम. पी. से सेक्शन ३७०, ३५ अ और लद्दाख के केंद्रशासित होने पर चर्चा करेंगे मा. शेखर मुंदडा. भाजपा के वरिष्ठ नेता, मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, की प्रमुख उपस्थिती मे कार्यक्रम संपन्न होगा.
ये कार्यक्रम सब के लिये खुला है pic.twitter.com/BCGkmG4dts
">एक चर्चा, धारा ३७० और लद्दाख पर"
— Jamyang Tsering Namgyal (@MPLadakh) October 8, 2019
लद्दाख के प्रसिद्ध युवा एम. पी. से सेक्शन ३७०, ३५ अ और लद्दाख के केंद्रशासित होने पर चर्चा करेंगे मा. शेखर मुंदडा. भाजपा के वरिष्ठ नेता, मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, की प्रमुख उपस्थिती मे कार्यक्रम संपन्न होगा.
ये कार्यक्रम सब के लिये खुला है pic.twitter.com/BCGkmG4dtsएक चर्चा, धारा ३७० और लद्दाख पर"
— Jamyang Tsering Namgyal (@MPLadakh) October 8, 2019
लद्दाख के प्रसिद्ध युवा एम. पी. से सेक्शन ३७०, ३५ अ और लद्दाख के केंद्रशासित होने पर चर्चा करेंगे मा. शेखर मुंदडा. भाजपा के वरिष्ठ नेता, मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, की प्रमुख उपस्थिती मे कार्यक्रम संपन्न होगा.
ये कार्यक्रम सब के लिये खुला है pic.twitter.com/BCGkmG4dts
जम्मू व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मात्र, काही कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याने याला विरोध करण्यात येत होता, असे नामग्याल म्हणाले. काही कुटुंब आणि फुटीरतावादी लोकांनी सामान्यांची एकजूट होऊ दिली नाही. यामुळे फुटीरतावाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना निवडणुकीत मतदारच उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा लडाखमध्ये मोठा सौर प्रकल्प होणार सुरू; भाजप खासदाराने 'या' घातल्या अटी
पुढे बोलताना खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी कलम 370 वरुन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने कलम 370 ला जोरदार विरोध केला. यावर, 'देशातील नागरिकांची विचारधारा वेगळी असेल, पण देश कधीही वेगळा असू शकत नाही', असे मत त्यांनी मांडले. सर्वांचा एक देश आहे. तसेच काँग्रेसचे अपूर्ण काम आम्ही पूर्ण केले असून, त्यांनी आम्हाला धन्यवाद द्यायला हवे असे ते म्हणाले.