ETV Bharat / city

Kunal Tilak on Politics : लोकमान्य टिळकांच्या नावाने राजकारण करू नका- वंशज कुणाल टिळकांचे आवाहन

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( MNS president Raj Thackeray ) जंगी सभा पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मश्चिदीवरील भोंगे उतरवण्याच्या आपल्या वक्तव्याच्या पुनरुच्चार केला आहे. तर दुसरीकडे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे ( tomb of Chhatrapati Shivaji Maharaj ) म्हटले. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी ( Lokmanya Tilak controversy ) केला होता.

कुणाल टिळक
कुणाल टिळक
author img

By

Published : May 2, 2022, 10:06 PM IST

Updated : May 2, 2022, 10:26 PM IST

पुणे - टिळकांच्या नावाने राजकारण करू नका, असे आवाहन लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक ( Kunal Tilak on political controversy ) यांनी राजकीय नेत्यांना केलं आहे. लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, असा आमचा दावा नसल्याचेदेखील कुणाल टिळक म्हणाले आहेत.

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( MNS president Raj Thackeray ) जंगी सभा पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मश्चिदीवरील भोंगे उतरवण्याच्या आपल्या वक्तव्याच्या पुनरुच्चार केला आहे. तर दुसरीकडे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे ( tomb of Chhatrapati Shivaji Maharaj ) म्हटले. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी ( Lokmanya Tilak controversy ) केला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून राज्यभरातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.यावर लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी प्रत्युत्तर देत टिळकांच्या नावाने राजकारण करू नका, असे आवाहन राजकीय नेत्यांना केले आहे.

लोकमान्य टिळकांच्या नावाने राजकारण करू नका

समाधी जीर्णोध्दारासाठी जमा झालेले पैसे टिळकांनी डेक्कन बँकेत ठेवले. जमा झालेल्या पैशांचा तपशील केसरीमध्ये छापण्यात आला. काही दिवसांनी डेक्कन बँक बुडाली. डेक्कन बॅंक बुडल्यावर जीर्णोद्धार समितीचे पैसे मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याला यश आले नाही. या वेळेस समाधी जीर्णोद्धार झाला. त्यावेळी समितीने सांगितलेले मुद्दे विचारात घेतल, असे कुणाल टिळक म्हणाले आहेत.

श्रीमंत कोकाटे यांची लोकमान्य टिळकांवर टीका-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळांचा जीर्णोद्धार करण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हाती घेतले. त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, पन्हाळा किल्ला, शिवनेरी किल्ला आणि रायगड यांचादेखील समावेश होता. पण टिळकांनीमध्येच खोडा घातला. शिवस्मारक रायगडावर करायचे, यासाठी प्रचंड निधी गोळा केला. त्या काळामध्ये ८० ते ९० हजार रुपये टिळकांनी गोळा केले. त्यातील एकही रुपया शिवरायांच्या समाधी स्थळासाठी खर्च केला नाही. त्यामध्ये त्यांनी गफला केला. शिवरायांच्या नावावरती पैसे खाणाऱ्या टिळकांनी रायगडावर एक साधा दगडही बसवला नाही. त्या टिळकांनी शिवसमाधीचे बांधकाम केले, असे धादांत खोटे राज ठाकरे बोलत असल्याचा गंभीर आरोप श्रीमंत कोकाटेंनी केला आहे. तर जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी देखील राज ठाकरेंचे वक्तव्य खोडत जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा-Chhagan Bhujbal On Raj Thackeray : टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली हे धादांत खोटं - छगन भुजबळ
हेही वाचा-RPI Demand to Action on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा, रिपब्लिकन पक्षाची मागणी
हेही वाचा-Raj Thackeray Ayodhya Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येत, योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता

Last Updated : May 2, 2022, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.