ETV Bharat / city

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे किरीट सोमैयांना प्रत्युत्तर; म्हणाले, बेकायदेशीर वास्तूंवर कारवाई करण्यासाठी...

author img

By

Published : Mar 27, 2022, 7:58 PM IST

किरीट सोमैयांनी अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यावरुन दापोलीत राज्य सरकारवर टीका ( Kirit Somaiya Dapoli Tour ) केली. त्यावरुन कोणत्याही बेकायदेशी वास्तूंवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना? अन्यथा न्यायालय आहे, असे प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिले ( Chhagan Bhujbal Reply Kirit Somaiya ) आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

पुणे - भाजपा नेते किरीट सोमैयांनी दापोलीत जाऊन परिवहन मंत्री अनिल परबांच्या रिसॉर्ट प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला ( Kirit Somaiya Dapoli Tour ) आहे. त्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना आरोप करायचे ते करू द्या, तक्रार करायची ती करू द्या. कोणत्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना? तरीही जर न्याय मिळाला नाही, तर न्यायालय आहे. यापूर्वी बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या. पण, आधी इतका गाजावाजा नव्हता, असे मतही यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केले ( Chhagan Bhujbal Reply Kirit Somaiya ) आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते करण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, शरद पवारांवर अशा प्रकारचे आरोप का करावेत हे कळत नाही. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारानेच जात त्यांनी काम केले आहे. त्यांचे घरचे वातावरण पुरोगामी आहे. आतापर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन ते जाताहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात. पडळकरांनी हा विचार करावा की, शरद पवारांनी मनुवादाला विरोध केला आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबात बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, मागासवर्गीय आयोगाने दिलेले रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत असलेला अहवाल आहे. तो देण्यात आम्हाला यश येईल. दुसरा आयोग नेमलेला आहे, तो ओबीसी आरक्षणाचे काम करेल. आधीचा आयोग बरखास्त करायचे की नाही हे राज्य सरकार ठरवेल. आधीचा आयोग दुसरे काम करेल.

तर, यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने आणि राजकीय लोकांना संपवण्यासाठी करु नये वाटते, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाई बाबत व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Raju Shetti : महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.