पुणे कसबा गणपती हे Kasba Ganapati पुण्याचं ग्रामदैवत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली, अशी आख्यायिका आहे. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लालमहाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी कसबा गणपतीचं दर्शन घेत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं 1893 मध्ये सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात कसबा गणपतीपासून होत असते.
याही वर्षी पालखीमध्येच गणेशाची मिरवणूक निघणार कसबा गणपतीचे हे 130 वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कसबा गणपतीची गाजत वाजत ढोल ताशांच्या गजरांमध्ये गणेशाची स्थापना होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीमध्येच गणेशाची मिरवणूक निघणार आहे. यावर्षी प्रसन्न वातावरण राहावा असं फुलाचं मंडप उभारण्यात येणार आहे.तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी मंडपामध्ये शहिदांचे सूर्याचे कार्याचे विविध दर्शन दाखवणारे चित्र व करण्यात येणार आहे. राज्यपालांच्या हस्ते मंडळाचे पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष यांनी दिलेली आहे.
हेही वाचा Ganesh Chaturthi Puja 2022 यंदा गणपतीचे केव्हा होणार आगमन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची वेळ